Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

विद्यार्थ्यांनी उद्योजक होण्याचे ध्येय बाळगावे : सरपंच सागर अभंग

टीम : धैर्य टाईम्स

विध्यार्थीदशे पासूनच अभ्यासामध्ये गती प्राप्त करताना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना उद्योगांचे परीक्षण करत उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगले पाहिजे असा सल्ला विडणी (ता. फलटण ) चे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी विध्यार्थ्यांना दिला.

विध्यार्थीदशे पासूनच अभ्यासामध्ये गती प्राप्त करताना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी विविध उद्योगांचे  परीक्षण करत उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगले पाहिजे असा सल्ला विडणी (ता. फलटण ) चे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी विध्यार्थ्यांना दिला. ते नामदेवराव सूर्यवंशी ( बेडके ) महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना युनिटचा विशेष श्रमसंस्कार शिबीर समारोप प्रसंगी विडणी येथे बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष चंद्रकांत पवार होते. यावेळी पत्रकार स. रा. मोहिते, धैर्य टाईम्सचे संपादक व प्रिंट व डिजिटल मीडिया असोसिएशनचे सातारा जिल्हाध्यक्ष सचिन मोरे, प्राचार्य डॉ. दिपक राऊत, प्रा. सतेज दणाणे, ग्रामविकास अधिकारी अप्पासाहेब साळुंखे, धनाजी नेरकर सर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 पुढे बोलताना सरपंच सागर अभंग म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाकडे लक्ष देताना केवळ नोकरी मिळवण्याकरिता शिक्षण न घेता विविध व्यवसायाचा व्यासंग, आधुनिक शेती, समाजकारण, राजकारण, याकडे करिअरची संधी म्हणून पाहणे काळाची गरज आहे. माझे बंधू कक्ष अधिकारी धीरज अभंग यांनी अपार कष्ट व मेहनतीच्या जोरावर उत्तुंग यश संपादन केले आहे. अशीच मेहनत आपणही करून भविष्यामध्ये आपणही यशस्वी व्हावे अशा सदिच्छा सागर अभंग यांनी या वेळी व्यक्त केल्या.

 प्रिंट व डिजिटल मीडिया असोसिएशन सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की, सात दिवसाच्या विडणी येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या सप्ताहाला निरोप देत असताना विडणी येथील व सध्या मुंबई येथे मंत्रालयामध्ये कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असणारे धीरज अभंग साहेबांचा आदर्श घेऊन आपणही आपल्या गावातील आदर्श अधिकारी व्हायचे ध्येय बाळगावे. तर विडणी सारख्या सुसंस्कृत गावातील अनेक उद्योजकांचे गुण आपल्या अंगी यावेत म्हणून दिवस रात्र मेहनत करावी. पत्रकार स. रा. मोहिते यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. पोलीस पाटील धनाजी नेरकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना स्पष्ट केले की, एन एस एस कॅम्प हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा क्षण असतो. अशा कॅम्पद्वारे विद्यार्थ्या मध्ये सामाजिक जाणीव रुजवली जाते व ग्राम विकास साधला जातो. यावेळी त्यांनी आपल्या कॉलेज जीवनातील एन एस एस कॅम्प चे अनुभव कथन केले.

विडणी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी आप्पासाहेब साळुंखे यांनी आपल्या भाषणामध्ये विडणी गाव व एन एस एस कॅम्प यांच्या समन्वयाबद्दल गौरव उद्गार व्यक्त केले तसेच विडणी गावचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास याबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व संस्थापक कै. नामदेवराव बळवंतराव सूर्यवंशी (बेडके) नानांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना चे प्रकल्पाधिकारी प्रा. डॉ. सतेज दणाणे यांनी सादर केले. त्यामध्ये त्यांनी शिबिरार्थी यांच्या कार्याचे कौतुक केले व विडणी गावचे सरपंच व ग्रामस्थ यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक राऊत यांनी एन. एस. एस. कॅम्पचा आढावा सादर केला.

 उपस्थित सर्व मान्यवर व पदाधिकारी यांचा पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विडणी ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थित मान्यवर, प्राध्यापक वृंद व सर्व शिबिरार्थींचा ही श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

सुरुवातीला शिबिरार्थीं शिवम घनवट, मयूर साळवे, कु. रिया मुलानी, कु. संजना चव्हाण, कु. धनश्री धोत्रे, रमेश बोडरे, समीर दडस, सूरज पोकळे, उमेश नाळे, कु. प्रेरणा रणवरे, कु. विशाखा मोरे, कु. साक्षी तिवाटणे इत्यादींनी एन एस एस कॅम्प चे अनुभव व गाव आणि ग्रामस्थां प्रति कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी तिवाटणे, प्रास्ताविक प्रा. डॉ. सतेज दणाणे, कॅम्प आढावा प्र. प्राचार्य डॉ. दीपक राऊत, स्वागत सत्कार प्रा. डॉ. संदेश बिचुकले, कार्यक्रमाचे आभार प्रकल्प अधिकारी प्रा. डॉ. सतेज दणाणे यांनी मानले.

रविवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिटचा 'विशेष श्रमसंस्कार शिबिर' (निवासी कॅम्प 13/02/23 ते 19/02/23) मौजे विडणी येथे संपन्न झाला. राष्ट्रीय सेवा योजना च्या घोषणा देऊन व राष्ट्रीय सेवा योजना गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER