Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
भाजपला दिलेला पाठिंबा ॲड. कांचन खरात यांनी घेतला मागे; स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू ठेवणार संविधान व घटनात्मक संस्थांच्या संरक्षणासाठी ॲड. कांचन खरात यांचे निवेदन; निष्पक्ष चौकशीची मागणी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू ते दमदार पत्रकार - शक्ती भोसले विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त भव्य दांडिया स्पर्धा; लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांच्या देवीच्या गोंधळाचे आकर्षण कै. श्रीराज दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिर परिसरात वॉटर कुलर भेट सिद्धी अबॅकस अकॅडमीचा राज्यस्तरीय स्पर्धेत डंका ; १२३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी ₹३ हजारांची लाच; मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे मंगळवार ६ ऑक्टोबरला भव्य आयोजन महिला व मुलींना मोठी संधी : मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स उत्तम मानसिक आरोग्य हीच खरी धनसंपदा : डॉ. दीपक राऊत सोनार समाजाचा सर्व शाखीय राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध :

संविधान व घटनात्मक संस्थांच्या संरक्षणासाठी ॲड. कांचन खरात यांचे निवेदन; निष्पक्ष चौकशीची मागणी

ईव्हीएम, पेपरफुटी, भ्रष्टाचार, शिक्षण आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या प्रश्नांवर केंद्र सरकारसह घटनात्मक यंत्रणांचे लक्ष वेधले
टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी - 


भारतीय संविधानाचे संरक्षण, घटनात्मक संस्थांची स्वायत्तता आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्यासाठी विविध गंभीर प्रश्नांवर स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी फलटण येथील सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी निवेदनाद्वारे केली आहे. दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या या निवेदनात त्यांनी केंद्र सरकारच्या कारभारासह निवडणूक प्रक्रिया, सरकारी परीक्षा, भ्रष्टाचार, शिक्षणव्यवस्था आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याशी संबंधित मुद्दे उपस्थित केले आहेत.


निवेदनात देशातील सर्व निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरद्वारे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. ईव्हीएम-व्हीव्हीपॅट यंत्रणांची पारदर्शकता, निवडणूक आयोगाची निष्पक्षता आणि पक्षफुटीनंतर पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह देण्याच्या निर्णयांची स्वतंत्र तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तसेच राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि लोकसभा अध्यक्ष यांच्या भूमिकेचा निष्पक्ष आढावा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


सरकारी नोकरभरतीतील पेपरफुटी, परीक्षा रद्द होणे आणि परीक्षा शुल्क परत न मिळण्याच्या प्रश्नांवर चिंता व्यक्त करत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वय आणि भविष्य वाया जाऊ नये, यासाठी संबंधित परीक्षा यंत्रणांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली. एमपीएससीसह विविध परीक्षा यंत्रणांमधील कथित गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.


भ्रष्टाचाराच्या तक्रारींची प्रभावी नोंद, पुरावे गोळा करताना तक्रारदारांना येणाऱ्या अडचणी आणि लाचलुचपत प्रतिबंधक कारवाईतील पुराव्यांच्या निकषांबाबत स्पष्टता असावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यासोबतच सरकारी शाळा बंद होणे अथवा त्यांचे विलीनीकरण, शिक्षकांची रिक्त पदे, बेरोजगारी, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यावरील बंदीच्या मागण्या आणि नागरिकांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याशी संबंधित प्रश्नांवर वस्तुनिष्ठ परीक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.


शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या नागरिकांवरील कारवाई, आंदोलकांवर दाखल होणारे गुन्हे आणि त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाकडून होणारे कथित दुर्लक्ष याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. नागरिकांना न्याय मागण्यासाठी आंदोलनाची वेळ येण्यापूर्वी त्यांच्या तक्रारींची दखल घेऊन प्रश्न सोडवावेत, तसेच मूलभूत अधिकारांचे संरक्षण करावे, असे त्यांनी म्हटले आहे.


इथेनॉल मिश्रित इंधनाचे आर्थिक परिणाम, यूपीआय व्यवहारांवरील शुल्कासंबंधी नियम आणि व्हॉट्सॲप, यूट्यूब व न्यूज पोर्टलच्या माध्यमातून बातम्या प्रसारित करण्यावर येणाऱ्या कथित मर्यादांचाही निवेदनात उल्लेख आहे.


या सर्व प्रकरणांची स्वतंत्र, निष्पक्ष व कालमर्यादित चौकशी करून निष्कर्ष सार्वजनिक करावेत, केंद्र सरकारचे संसदीय उत्तरदायित्व निश्चित करावे आणि लोकशाही संस्थांची स्वायत्तता व पारदर्शकता सुनिश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. राष्ट्रपती महोदयांनी आपल्या घटनात्मक अधिकारक्षेत्रात आवश्यक कार्यवाही करावी, तर सरन्यायाधीशांनी न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रातील प्रश्नांवर कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.


“सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी संविधानापेक्षा मोठे असू शकत नाही. लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी निष्पक्ष चौकशी, निश्चित उत्तरदायित्व आणि कायद्यानुसार ठोस कार्यवाही आवश्यक आहे,” अशी भूमिका ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी मांडली आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER