Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
सिद्धी अबॅकस अकॅडमीचा राज्यस्तरीय स्पर्धेत डंका ; १२३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी ₹३ हजारांची लाच; मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे मंगळवार ६ ऑक्टोबरला भव्य आयोजन महिला व मुलींना मोठी संधी : मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स उत्तम मानसिक आरोग्य हीच खरी धनसंपदा : डॉ. दीपक राऊत सोनार समाजाचा सर्व शाखीय राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन

सिद्धी अबॅकस अकॅडमीचा राज्यस्तरीय स्पर्धेत डंका ; १२३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल

बेस्ट फ्रँचायजी, बेस्ट सेंटरसह पाच शिक्षिकांना बेस्ट टीचर पुरस्कार
टीम : धैर्य टाईम्स
सिद्धी अबॅकस अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सौ. रेखा खिलारे, सौ. सुनीता जाधव, सौ. पूजा गुळस्कर, सौ. सारंगा यादव आणि सौ. पद्मजा जंगम या पाचही शिक्षिकांना ‘बेस्ट टीचर’ म्हणून घोषित करून पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले

फलटण प्रतिनिधी : 


ॲडेलीले अबॅकस यांच्या वतीने पुणे येथील लोणी, काळभोर लॉन्स येथे नुकतीच राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातील विविध भागांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. फलटण येथील IPA फलटण सेंटरच्या सिद्धी अबॅकस अकॅडमीच्या तब्बल १२३ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.

या स्पर्धेत अकॅडमीच्या सर्व १२३ विद्यार्थ्यांनी यश संपादन करून १०० टक्के निकालाची नोंद केली. विशेष म्हणजे सर्व विद्यार्थी पहिल्या पाच क्रमांकांमध्ये स्थान मिळवून उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


स्पर्धेत विद्यार्थ्यांना केवळ पाच मिनिटांत १०० गणिते सोडविण्याचे आव्हान देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी वेग आणि अचूकतेचा सुरेख समन्वय साधत हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले. 


या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत IPA फलटण सिद्धी अबॅकस सेंटरला ‘बेस्ट सेंटर’ म्हणून घोषित करण्यात आले. अकॅडमीच्या संचालिका सौ. कल्पना जाधव यांना ‘बेस्ट फ्रँचायजी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


तसेच सिद्धी अबॅकस अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सौ. रेखा खिलारे, सौ. सुनीता जाधव, सौ. पूजा गुळस्कर, सौ. सारंगा यादव आणि सौ. पद्मजा जंगम या पाचही शिक्षिकांना ‘बेस्ट टीचर’ म्हणून घोषित करून पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.


विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यांच्या जोरावर मिळालेले हे यश फलटणच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. सिद्धी अबॅकस अकॅडमीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थी, शिक्षक, संचालिका आणि पालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER