Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
दुधेबावी फेस्टिव्हलचे सलग २६ व्या वर्षी आयोजन; ६ नोव्हेंबरपासून रंगणार संत गाडगेबाबा व्याख्यानमाला युवा उद्योजक, यशस्वी बिल्डर आणि धाडसी राजकीय व्यक्तिमत्त्व सागर शहा सौ. प्रिया अमोल नाळे-बोराटे यांची राज्य स्तरावर आयडॉल शिक्षक म्हणून निवड फलटण तालुक्यासाठी धोम-बलकवडीचे आवर्तन किमान ४५ दिवस सोडावे; पाणीपट्टी माफ करण्याची आमदार सचिन पाटील यांची मागणी दादांना मानलं पाहिजे! विरोधकांकडूनही रणजितदादांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचे कौतुक; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दाखवली ताकद! सोसायटी मतदारसंघात समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा अवघ्या 11 मतांनी पराभव; विजयापेक्षा संघर्षाचीच तालुक्यात चर्चा प्रत्येकाचे नशीब जॅकी श्रॉफ सारखे नसते एखादाच असतो ज्याला अशी संधी मिळते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी फलटणमध्ये कलम १६३ लागू; मतदान केंद्र परिसरात कडक निर्बंध - कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार डॉ. अभिजित जाधव श्री दत्त इंडिया साखर कारखान्याकडून सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसाच्या बिलापोटी प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे रक्कम वर्ग - मुख्य प्रशासनाधिकारी अजितराव जगताप यांची माहिती ५६ गावांत ३२ विषयांवर प्रवचनांची यशस्वी मालिका; भारतीय बौद्ध महासभा फलटण शाखेचा वर्षावास सांगता समारोह उत्साहात संपन्न आपली फलटण मॅरेथॉनच्या माध्यमातून डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी लोकांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची : रणजितसिंह नाईक निंबाळकर शेतकरी-जनावरांचा पाण्यासाठी टाहो, नेत्यांना पाहिजे घुंगरांचा खणखणाट! शेतकरी पाणी - चाऱ्यासाठी हवालदिल, नेते मात्र लावणीच्या तालावर दंग सांगलीतील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत फलटण वकील संघाची चमकदार कामगिरी; सातारा जिल्हा गुणतालिकेत प्रथम आधी रेट बघा मग खरेदी करा! सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आणि एस.एस. मोबाईलमध्ये दसरा-दिवाळीनिमित्त बंपर ऑफर्सची पर्वणी माळजाई देवीची महाआरती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार - प्रमोद निंबाळकर यांची माहिती भाजपला दिलेला पाठिंबा ॲड. कांचन खरात यांनी घेतला मागे; स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू ठेवणार संविधान व घटनात्मक संस्थांच्या संरक्षणासाठी ॲड. कांचन खरात यांचे निवेदन; निष्पक्ष चौकशीची मागणी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू ते दमदार पत्रकार - शक्ती भोसले विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त भव्य दांडिया स्पर्धा; लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांच्या देवीच्या गोंधळाचे आकर्षण कै. श्रीराज दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिर परिसरात वॉटर कुलर भेट सिद्धी अबॅकस अकॅडमीचा राज्यस्तरीय स्पर्धेत डंका ; १२३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी ₹३ हजारांची लाच; मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे मंगळवार ६ ऑक्टोबरला भव्य आयोजन महिला व मुलींना मोठी संधी : मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स उत्तम मानसिक आरोग्य हीच खरी धनसंपदा : डॉ. दीपक राऊत सोनार समाजाचा सर्व शाखीय राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन

दुधेबावी फेस्टिव्हलचे सलग २६ व्या वर्षी आयोजन; ६ नोव्हेंबरपासून रंगणार संत गाडगेबाबा व्याख्यानमाला

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या हस्ते उद्घाटन; विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती, राज्यस्तरीय पुरस्कारांचेही वितरण
टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी : 


फलटण तालुक्यातील दुधेबावी येथे दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने सलग २६ व्या वर्षी दुधेबावी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दिनांक ६ नोव्हेंबर ते मंगळवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ७ वाजता संत गाडगेबाबा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून, या फेस्टिव्हलचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या शुभहस्ते होणार आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी दिली.


उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील असणार आहेत. यावेळी विशेष अतिथी म्हणून प्रशासन व व्यवस्थापन वनविभाग, कुंडल (सांगली) येथील प्रशासकीय अधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे तसेच चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड, बारामतीचे चेअरमन किशोर कुमार शहा उपस्थित राहणार आहेत.


उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नेते उदयराव शिंदे, अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे कोषाध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके, राष्ट्रीय शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष बलवंत पाटील, महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन विशाल कणसे, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अरविंदभाई मेहता, महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ, पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर, जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता दिनकरराव सोनवलकर, पंचायत समिती सदस्या सौ. विजया सोनवलकर, ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. भावना सोनवलकर, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाषराव सोनवलकर, फलटण येथील नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, एम.एस.ई.बी. बारामतीचे कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर आणि जलविद्युत प्रकल्प सातारा येथील उपविभागीय अभियंता दिग्विजय सोनवलकर उपस्थित राहणार आहेत.


फेस्टिव्हलच्या उद्घाटन समारंभानिमित्त सुप्रसिद्ध निवेदक राजेंद्र खरात प्रस्तुत आणि वाघमोडे ज्वेलर्स अँड सन्स प्रायोजित 'खेळ रंगला पैठणीचा' हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याबाबत संत गाडगेबाबा व्याख्यानमाला कमिटीचे अध्यक्ष डॉ. सागर कराडे, सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष सचिन सोनवलकर, क्रीडा समितीचे अध्यक्ष कांता सोनवलकर, दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजयकुमार नाळे, सचिव विठ्ठल सोनवलकर, खजिनदार डॉ. युवराज एकळ आणि कार्याध्यक्ष संतोष भांड यांनी माहिती दिली.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव असणार आहेत. यावेळी चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड, बारामतीचे चेअरमन किशोर कुमार शहा यांना राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्काराने, तर सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांना राज्यस्तरीय प्रशासनरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.


या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रा. पोपटराव मिंट, चक्रधर ऍग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड, दुधेबावीचे संस्थापक संपतराव नाळे आणि मुंबईचे पोलीस उपनिरीक्षक सागर नाळे उपस्थित राहणार आहेत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER