फलटण प्रतिनिधी :
शारदीय नवरात्रोत्सव २०२६ निमित्त विडणी येथे भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा देवीचा पारंपरिक गोंधळ, भव्य दांडिया स्पर्धा आणि भरघोस बक्षिसे ही या उत्सवाची प्रमुख आकर्षणे असणार आहेत.
महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, पारंपरिक संस्कृतीचे जतन व्हावे आणि नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणित व्हावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विडणी पंचक्रोशीतील माता-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सांस्कृतिक सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उत्सवाचे आयोजन लोकनियुक्त सरपंच सागरभैय्या अभंग, सौ. अमृताताई सागरभैय्या अभंग अध्यक्षा सार्वजनिक नवरात्र उत्सव समिती, विडणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

















