Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप

सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे

सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सदैव धावून जाणारे, वैद्यकीय सेवेला सामाजिक बांधिलकीची जोड देणारे व्यक्तिमत्त्व
टीम : धैर्य टाईम्स

वैद्यकीय व्यवसाय हा केवळ व्यवसाय न मानता त्याला सेवाभावाची जोड देत सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. सुभाष गुळवे यांची फलटण शहरात विशेष ओळख निर्माण झाली आहे. ४ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर विविध क्षेत्रांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, त्यांच्या आजवरच्या कार्याचा आणि समाजाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा आवर्जून उल्लेख होत आहे.


फलटण येथील एक प्रतिष्ठित वैद्यकीय व्यावसायिक म्हणून डॉ. गुळवे यांनी प्रामाणिकपणा, विश्वासार्हता आणि सेवाभाव ही आपल्या व्यवसायाची प्रमुख मूल्ये जपली आहेत. रुग्णांशी आपुलकीने संवाद साधणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि गरजेच्या वेळी मदतीसाठी तत्पर राहणे, हा त्यांच्या स्वभावाचा विशेष गुण मानला जातो.


वारीत सेवा, समाजासाठी समर्पण


पंढरपूरच्या आषाढी वारीच्या निमित्ताने दरवर्षी फलटण येथे वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम डॉ. गुळवे सातत्याने राबवितात. हजारो वारकरी भक्तिभावाने पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हीच खरी विठ्ठलसेवा मानून ते आपले वैद्यकीय ज्ञान समाजाच्या उपयोगी आणतात.

वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक असूनही सामाजिक बांधिलकी जपण्याची त्यांची भूमिका अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ‘माणूस म्हणून माणसाच्या उपयोगी पडणे’ हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा केंद्रबिंदू आहे.


रामोशी समाजाचे आदर्श व्यक्तिमत्त्व


रामोशी समाजाच्या सामाजिक प्रगतीसाठी सातत्याने पुढाकार घेणारे आणि समाजातील प्रश्नांसाठी ठामपणे भूमिका मांडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. सुभाष गुळवे यांच्याकडे पाहिले जाते. समाजातील युवकांनी शिक्षण घ्यावे, विविध क्षेत्रांत पुढे जावे आणि आपल्या कर्तृत्वातून समाजाची ओळख निर्माण करावी, यासाठी ते सातत्याने प्रोत्साहन देतात.

समाजातील कोणत्याही व्यक्तीला अडचण आली तर ‘आपला माणूस’ या भावनेने मदतीला धावून जाणे, हा त्यांच्या स्वभावातील महत्त्वाचा गुण आहे. त्यामुळेच समाजात त्यांच्याबद्दल आपुलकी आणि विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे.


राजकीय क्षेत्रातही विश्वासाचे नाते


डॉ. सुभाष गुळवे यांची राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील वाटचालही उल्लेखनीय आहे. माजी खासदार कैलासवासी हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची विशेष ओळख होती. त्यांच्या विचारांशी आणि कार्याशी नाते जोडत त्यांनी सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावली.


त्यानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या डॉक्टर सेलचे फलटण शहराध्यक्ष म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील सहकाऱ्यांना संघटित करण्यासोबतच विविध सामाजिक उपक्रमांत ते सक्रिय सहभाग घेत आहेत. फलटणचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू आणि खास सहकारी म्हणूनही डॉ. गुळवे यांची ओळख आहे. सार्वजनिक जीवनात काम करताना व्यक्तीपेक्षा विचार, विकास आणि समाजहिताला प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका दिसून येते.


सुशिक्षित संस्कारांचा वारसा


डॉ. सुभाष गुळवे यांचे कुटुंब मूळचे नारायणगाव, जिल्हा पुणे येथील. व्यवसायाच्या निमित्ताने गुळवे कुटुंब फलटण येथे स्थायिक झाले. त्यांच्या कुटुंबाला शिक्षण आणि सामाजिक जाणीवांचा समृद्ध वारसा लाभला आहे. त्यांचे वडील शिरूर येथे एस.टी. महामंडळात वर्ग-२ अधिकारी म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर ते शेती व्यवसायाकडे वळले. आई प्राथमिक शिक्षिका म्हणून सेवा बजावून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांचे आजोबा विस्ताराधिकारी, तर आजी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. कुटुंबातील मामांपैकी एकजण प्राध्यापक असून दुसरे मामा सहारा सिटी येथे मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी सौ.मालती याही उच्चशिक्षित आहेत. तर त्यांची दोन्हीही मुले तेजल आणि सतेज यांचे सध्या शिक्षण सुरु आहे.


अशा सुशिक्षित आणि संस्कारक्षम वातावरणात डॉ. गुळवे यांचे व्यक्तिमत्त्व घडले. यशामागे माणुसकीचा पाया वैद्यकीय व्यवसाय, सामाजिक कार्य, समाजासाठीची बांधिलकी आणि सार्वजनिक जीवनातील सक्रिय सहभाग या सर्वांचा समतोल साधताना डॉ. सुभाष गुळवे यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या अडचणीच्या काळात त्याच्यासाठी धावून जाण्याची वृत्ती. प्रसिद्धीपेक्षा प्रत्यक्ष मदतीला महत्त्व देणाऱ्या त्यांच्या या स्वभावामुळे अनेकांच्या मनात त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे.


४ सप्टेंबर हा त्यांचा वाढदिवस. या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करताना एकच अपेक्षा व्यक्त करता येईल त्यांच्या हातून वैद्यकीय सेवा, सामाजिक कार्य आणि समाजहिताची ही वाटचाल यापुढेही अशीच अखंड सुरू राहो.

डॉ. सुभाष गुळवे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, यश आणि समाजसेवेची अखंड ऊर्जा लाभो, हीच मनापासून सदिच्छा!


धैर्य टाईम्स परिवार 


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER