फलटण :
विडणी ( ता. फलटण )ग्रामपंचायत व विडणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. १४ सप्टेंबर ते रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विडणीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी दिली.
सोमवार, दि. १४ सप्टेंबर रोजी श्रींचे आगमन होणार आहे. मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी ‘झी टॉकीज’ फेम ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे नगरकर यांची कीर्तन सेवा होणार आहे. बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी भारूडकार ह.भ.प. श्री. महादेव महाराज पळसदेवकर (सिंधखेडचा राजा) यांचे भारूड आयोजित करण्यात आले आहे.
गुरुवार, दि. १७ सप्टेंबर रोजी ‘खेळ पैठणीचा’ कुमार देवकाते प्रस्तुत ‘महा मिनिस्टर खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम होणार आहे. शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी विडणी गावातील सर्व जिल्हा परिषद शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम व महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांच्या विद्यमाने सौभाग्यच लेणं वाटप प्रत्येक महिलेसाठी सौभाग्यच लेणं. सायंकाळी ७ श्रींची महिलांच्या हस्ते महाआरती व ढोल ताशांच्या गजरात श्रींची भव्य मिरवणूक. रात्री ९ वाजता महाप्रसाद असा कार्यक्रम होणार आहे.
सर्व कार्यक्रमांचे ठिकाण ग्रामपंचायत कार्यालयासमोर, विडणी येथे असून, गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक लोकनियुक्त सरपंच सागर अभंग उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत, विडणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.











