Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
आधी रेट बघा मग खरेदी करा! सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आणि एस.एस. मोबाईलमध्ये दसरा-दिवाळीनिमित्त बंपर ऑफर्सची पर्वणी माळजाई देवीची महाआरती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार - प्रमोद निंबाळकर यांची माहिती भाजपला दिलेला पाठिंबा ॲड. कांचन खरात यांनी घेतला मागे; स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू ठेवणार संविधान व घटनात्मक संस्थांच्या संरक्षणासाठी ॲड. कांचन खरात यांचे निवेदन; निष्पक्ष चौकशीची मागणी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू ते दमदार पत्रकार - शक्ती भोसले विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त भव्य दांडिया स्पर्धा; लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांच्या देवीच्या गोंधळाचे आकर्षण कै. श्रीराज दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिर परिसरात वॉटर कुलर भेट सिद्धी अबॅकस अकॅडमीचा राज्यस्तरीय स्पर्धेत डंका ; १२३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी ₹३ हजारांची लाच; मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे मंगळवार ६ ऑक्टोबरला भव्य आयोजन महिला व मुलींना मोठी संधी : मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स उत्तम मानसिक आरोग्य हीच खरी धनसंपदा : डॉ. दीपक राऊत सोनार समाजाचा सर्व शाखीय राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न

फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत

टीम : धैर्य टाईम्स
फलटणमधील डॉक्टर आत्महत्या ही फक्त एक वैयक्तिक शोकांतिका नाही; ती संपूर्ण समाजाच्या मानसिक आरोग्यविषयक संवेदनाशून्यतेचे प्रतीक आहे. तो डॉक्टर होता , पण सर्वात आधी तो माणूस होता . त्यालाही भावनिक आधार, सहानुभूती आणि मानसिक आरोग्याची सुरक्षा हवी होती - प्रा. डॉ. दिपक राऊत -पवार

फलटणसारख्या प्रगत होत असलेल्या शहरात घडलेली डॉक्टर आत्महत्या प्रकरणांने समाजाला अंतर्मुख केले आहे. जी व्यक्ती इतरांच्या आरोग्याची काळजी घेते, आयुष्य वाचवते, आजारावर उपचार करते तीच व्यक्ती स्वतःच्या वेदनांशी झुंज देताना शेवटी जीवन संपवते, हा किती मोठा सामाजिक, व्यावसायिक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थेतील पराभव आहे हे आपण मान्य करायलाच हवे.


 तीही एक "व्यक्ती" होती डॉक्टर म्हणजे फक्त “व्यवसायिक” नव्हे ती एक भावनांनी, ताणांनी, अपेक्षांनी, अपयशांनी आणि जबाबदाऱ्यांनी भारलेली मानवी व्यक्ती असते. तिच्या मनातही भीती असते, ताण असतो, थकवा असतो. समाज डॉक्टरकडून नेहमीच परिपूर्णतेची अपेक्षा ठेवतो . “डॉक्टर चुका करत नाहीत”, “डॉक्टरांना काही होत नाही”, अशा भ्रमामुळे त्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्याच्या गरजा पूर्ण दुर्लक्षित राहतात.मानसिक आरोग्य जपण्याचा तिचाही अधिकार होता.


भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक नागरिकाला आरोग्याचा म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा समान अधिकार आहे. डॉक्टर असो, शेतकरी असो किंवा विद्यार्थी मानसिक आरोग्य राखण्यासाठी आवश्यक सुविधा, मार्गदर्शन, समुपदेशन, आणि उपचार मिळणे हा त्याचा मूलभूत मानवी हक्क आहे.


मात्र आपल्या आरोग्यव्यवस्थेत अजूनही मानसिक आरोग्याकडे दुय्यम दर्जाने पाहिले जाते. रुग्णालयांमध्ये मनोविज्ञान विभाग दुर्लक्षित राहतात, समुपदेशन सेवा अपुऱ्या असतात आणि व्यावसायिक मानसोपचारतज्ञ किंवा समुपदेशकांची उपलब्धता अत्यल्प आहे हे असं वास्तव आहे.


वैद्यकीय व्यवसाय अत्यंत जबाबदारीचा आहे. रात्रंदिवस काम, रुग्णांची काळजी, समाजातील अपेक्षा, आर्थिक दडपण, कुटुंबीयांशी कमी संवाद या सर्वांमुळे भावनिक एकाकीपणा निर्माण होतो. जेव्हा या मानसिक भारासाठी कुणी ऐकून घेणारा, समजून घेणारा किंवा मार्गदर्शन करणारा नसतो, तेव्हा मनाचा तोल ढळू लागतो.अशा वेळी जर सुलभ मानसिक आरोग्य सेवा, तज्ज्ञ समुपदेशक वा मानसोपचार उपलब्ध असते, तर अनेक आयुष्ये वाचू शकतात.मानसिक आरोग्य सेवांची अनुपलब्धता मूळ कारणा मुळे आज मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे.


ग्रामीण शहरी आणि उपनगरातील आरोग्य केंद्रांत आजही मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक किंवा मनोचिकित्सकांची पदे रिक्त आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे व रुग्णालयांमध्ये मानसिक आरोग्य कार्यक्रम फक्त नावापुरते आहेत.


फलटणसारख्या ठिकाणीही खास मानसिक आरोग्य सुविधा, तणाव व्यवस्थापन कार्यशाळा, व्यावसायिक समुपदेशन केंद्र यांची तातडीने गरज आहे. त्या क्षेत्रातील सेवा देणारे तज्ञ ही उपलब्ध आहेत फक्त त्यांना सेवा देणासाठी आवश्यक असणाऱ्या फलटण आरोग्य विभागाच्या हॉस्पिटलमध्ये संधी(जागा) उपलब्ध करून देणे हे फलटण आरोग्य मंडळाचे आद्य कर्तव्य फलटणकरासाठी आहे आणि त्यांनी ते करावे. जेणेकरून भविष्यामध्ये आणखीन अशा घटना घडण्यास आळा बसेल व फलटणचे नाव महाराष्ट्रात भारतात बदनाम होणार नाही.


जेव्हा डॉक्टरसारख्या शिक्षित, वैद्यकीय जाण असलेल्या व्यक्तीलाही योग्य मानसिक आधार उपलब्ध होत नाही, तेव्हा सामान्य लोकांच्या बाबतीत स्थिती किती गंभीर असेल याचा विचारच शहारा आणणारा आहे.

यासाठी काही खालील उपायांची दिशा आपण अमलात आणू शकतो - 

प्रत्येक रुग्णालयात मानसशास्त्रज्ञ व समुपदेशक नियुक्त करणे, मानसिक आरोग्य तपासणी ही वैद्यकीय तपासणीइतकीच महत्त्वाची ठरवणे,  डॉक्टरांसाठी सपोर्ट ग्रुप व स्ट्रेस मॅनेजमेंट कार्यक्रम नियमित राबवणे, मानसिक आरोग्य साक्षरता वाढवणे – "मानसिक आजार म्हणजे कमकुवतपणा नव्हे" हे समाजाला पटवून देणे, राज्य व केंद्र शासनाने जिल्हा पातळीवरील मानसिक आरोग्य योजना मजबूत करणे.

फलटणमधील डॉक्टर आत्महत्या ही फक्त एक वैयक्तिक शोकांतिका नाही; ती संपूर्ण समाजाच्या मानसिक आरोग्यविषयक संवेदनाशून्यतेचे प्रतीक आहे. तो डॉक्टर होता , पण सर्वात आधी तो माणूस होता . त्यालाही भावनिक आधार, सहानुभूती आणि मानसिक आरोग्याची सुरक्षा हवी होती.


ही घटना आपल्याला स्मरण करून देते की मानसिक आरोग्य हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे, आणि त्या सेवांचा अभाव ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक जबाबदारीची चूक आहे . याबाबत आरोग्य सेवा क्षेत्रामधील प्रशासकीय राजकारणी लोकांनी अंतर्मुख होऊन विचार करा व त्याविषयी जनजागृती होऊन मानसिक आरोग्य सेवा पुरवणाऱ्या तज्ञ व्यक्ती व संघटनांना प्राधान्यक्रम द्या.


लेखक -  डॉ.दिपक रामचंद्र राऊत पवार  

MA. M.Phil.Ph.D Psychology 

Dip.in TTE 

Dip. in School psychology 

Dip.in hypnotherapy 

समुपदेशक व पुनर्वसन मानसशास्त्रज्ञ 

Reg no.

RCI CRR A 29749

New Delhi


 डॉ.सौ.तेजश्री दीपक राऊत पवार 

MA.Ph.d Philosophy 

 समुपदेशक 

मनोविकास मानसशास्त्रीय समुपदेशन व मार्गदर्शन केंद्र फलटण ता. फलटण जि. सातारा महाराष्ट्र

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER