फलटण दिनांक 29 ( प्रतिनिधी )
सर्व शाखीय सोनार समाज राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळावा मंगळवार दिनांक ६ ऑक्टोवर २०२६ रोजी अमृता लॉन्स घुलेवाडी फाटा संगमनेर जि. अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला आहे. वधु वर परिचय मेळाव्याचे उदघाटन श्री क्षेत्र आळंदी येथील रामायणाचार्य ह. भ. प. साध्वी वैष्णवी दीदी सरस्वती, संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, संगमनेर येथील प्रसिद्ध सराफ दत्तात्रय मैड, यांच्या हस्ते होणार असून मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सुवर्ण नागरी सहकारी पतसंस्था संगमनेर चे चेअरमन विजयकुमार डहाळे हे भूषविणारा आहेत, प्रमुख अतिथी म्हणून नाशिक चे पुरवठा निरीक्षक डॉक्टर वेदांत राजेंद्र कपोते हे उपस्थित राहणार आहेत.
सकाळी दहा वाजता सुरू होणाऱ्या या वधू वर परिचय मेळाव्याचा लाभ सुवर्णकार समाजातील व इच्छुक वधूवरांनी घ्यावा असे आवाहन श्रीमती मीनाताई सोनार, सौ अनिता शहाणे, श्रीमती गीताताई नवसे, सुरेखाताई लोळगे, स्वातीताई मुंडलिक, सौ. माधुरीताई माळवे, सौ जयाताई कुलथे, सौ अनिताताई दारवेकर तसेच भगवान, शहाणे, गोपाळ कुलथे, संदीप उदावंत, श्रीकांत जोजारे, ववनराव कुलथे, रवी माळवे, संग्राम मयूर, राजेंद्र कुलथे,मनोज पळसकर, योगेश शहाणे आदींनी केले आहे.













