Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त भव्य दांडिया स्पर्धा; लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांच्या देवीच्या गोंधळाचे आकर्षण कै. श्रीराज दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिर परिसरात वॉटर कुलर भेट सिद्धी अबॅकस अकॅडमीचा राज्यस्तरीय स्पर्धेत डंका ; १२३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी ₹३ हजारांची लाच; मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे मंगळवार ६ ऑक्टोबरला भव्य आयोजन महिला व मुलींना मोठी संधी : मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स उत्तम मानसिक आरोग्य हीच खरी धनसंपदा : डॉ. दीपक राऊत सोनार समाजाचा सर्व शाखीय राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट

टीम : धैर्य टाईम्स

फलटण  - धैर्य टाईम्स मीडिया 


रोटरी क्लब ऑफ फलटण तालुका यांच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या श्री जितोबा विद्यालय, जिंती, ता. फलटण, जि. सातारा येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आरोग्यविषयक व सामाजिक जाणीवा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यालयास संगणक संच भेट देण्यात आला.


बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना संगणक व एआय शिक्षणाची आवश्यकता लक्षात घेऊन रोटरी क्लबच्या वतीने हा संगणक संच देण्यात आला. तसेच विद्यालय परिसरात वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिर, प्लास्टिक निर्मूलन जनजागृती आणि वैज्ञानिक जाणीव जागृती कार्यक्रम घेण्यात आले.


रोटरी क्लब ऑफ फलटणचे संस्थापक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. रो. महेश बर्वे, राजेंद्र रणवरे, प्रकाश रणवरे, महादेव रणवरे, नवनाथ रणवरे, चंद्रकांत रणवरे, शरदराव रणवरे, विनायकराव रणवरे, शरदसर रणवरे, जगदेवराव रणवरे, माधुरी जाधव, ताराचंद्र आवळे आदी मान्यवर उपस्थित होते.


आरोग्य तपासणी शिबिरात विद्यालयातील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले. या शिबिरासाठी बालरोगतज्ज्ञ डॉ. अंकिता गांधी व डॉ. सई खराडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. प्लास्टिक निर्मूलन जनजागृती कार्यक्रमात रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. रो. महेश बर्वे यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिकचा वापर टाळणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना प्लास्टिक निर्मूलनाची शपथ देण्यात आली.


रोटरी क्लबचे सचिव सुधीर इंगळे यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग प्रत्यक्ष करून दाखवत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन आणि विवेकपूर्ण वैज्ञानिक विचारसरणीबाबत मार्गदर्शन केले.


या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता, पर्यावरण संवर्धनाची भावना, वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच अंधश्रद्धेविरोधात विवेकपूर्ण विचारसरणी निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक समुपदेशक ताराचंद्र आवळे यांनी केले. सूत्रसंचालन अंकुश सोळंकी यांनी केले, तर आभार अमोल जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवनाथ रणवरे, प्रणव रणवरे, रणजित रणवरे तसेच विद्यालयातील शिक्षकांनी सहकार्य केले. यावेळी विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी, जिंती गावातील ग्रामस्थ, रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER