फलटण प्रतिनिधी -
निंबोडी. ता. खंडाळा येथील लखन उज्वला विलास शेळके पाटील यांची इंडियन एअर फोर्स मध्ये नुकतीच निवड झाली.
या यशाबद्दल त्यांचा लोणंद या ठिकाणी सत्कार करण्यात आला. त्यांनी स्वरूप अकॅडमी येथे 8 महिने प्रशिक्षण घेतले. भिसे सर यांच्या मार्गदर्शना खाली त्यांची निवड झाली. त्यांच्या सत्कारावेळी दशरथ धायगुडे, किरण गोवेकर, विलास शेळके, नितीन सुळ, आदिनाथ महाराज धायगुडे, रोहन धायगुडे, गणेश कोळेकर, अमोल गोवेकर, नवनाथ शेळके, डॉ.प्रताप गोवेकर, अभय गोवेकर, किशोर गोवेकर, गणेश गोवेकर, नारायण गोवेकर, युवराज गोवेकर यांच्यासह यावेळी समाज बांधव उपस्थित होते.



















