विडणी (फलटण ) येथे प्रामपंचायत सन 2022 अनुषंगाने आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. दुपार 3 वाजेपर्यंत 67 % च्या पुढे मतदान झाले आहे.
आज सकाळ 7 वाजल्यापासून मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. दुपारी 3 वाजेपर्यंत विडणी येथे 8386 पैकी 5749 मतदारांनी आपला हक्क बजावला होता.
विडणी येथील ग्रामपंचायत निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत उत्तरेश्वर पॅनेल विरोधत भाजपा पुरस्कृत खासदार गट विडणी विकास आघाडी अशी होत आहे. तर थेट सरपंच पदाच्या निवडीसाठी एक अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत.


















