फलटण प्रतिनिधी –
कोळकी गटातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जयकुमार शिंदे यांनी आज सकाळी मतदान केंद्रावर सर्वसामान्य मतदारांप्रमाणे रांगेत उभे राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी कोणताही विशेष सन्मान किंवा प्राधान्य न घेता शिस्तबद्ध पद्धतीने मतदान केल्याने उपस्थित मतदारांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.
मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जयकुमार शिंदे यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. “लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावे आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करावा,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कोळकी परिसरातील विविध मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची रांग दिसून येत असून महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक उत्साहाने मतदान करताना दिसत आहेत. शांततापूर्ण आणि उत्साही वातावरणात मतदान प्रक्रिया सुरू आहे.

















