Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
ग्रामीण भागातील युवकांना दिशा देणारी दुधेबावीची व्याख्यानमाला प्रेरणादायी – न्यायमूर्ती अनिल पानसरे विमानतळ परिसरात दुचाकीस्वारांची स्टंटबाजी; नागरिकांचा जीव धोक्यात, फलटण पोलिस कारवाई करणार का? जिल्हा बँकेच्या निकालाने राजे गटाला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आणली : अशोकराव जाधव दिवाळीच्या मुहूर्तावर फलटणमध्ये ‘निसर्ग पार्क’चा गृहप्रकल्प; फलटण येथे २ बीएचकेच्या ६० बंगल्यांचा भव्य प्रकल्प - बुकिंग सुरू फलटण न्यायालय परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; ४ हजारांची लाच घेताना खासगी वकील रंगेहात जेरबंद दुधेबावी फेस्टिव्हलचे सलग २६ व्या वर्षी आयोजन; ६ नोव्हेंबरपासून रंगणार संत गाडगेबाबा व्याख्यानमाला युवा उद्योजक, यशस्वी बिल्डर आणि धाडसी राजकीय व्यक्तिमत्त्व सागर शहा सौ. प्रिया अमोल नाळे-बोराटे यांची राज्य स्तरावर आयडॉल शिक्षक म्हणून निवड फलटण तालुक्यासाठी धोम-बलकवडीचे आवर्तन किमान ४५ दिवस सोडावे; पाणीपट्टी माफ करण्याची आमदार सचिन पाटील यांची मागणी दादांना मानलं पाहिजे! विरोधकांकडूनही रणजितदादांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचे कौतुक; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दाखवली ताकद! सोसायटी मतदारसंघात समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा अवघ्या 11 मतांनी पराभव; विजयापेक्षा संघर्षाचीच तालुक्यात चर्चा प्रत्येकाचे नशीब जॅकी श्रॉफ सारखे नसते एखादाच असतो ज्याला अशी संधी मिळते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी फलटणमध्ये कलम १६३ लागू; मतदान केंद्र परिसरात कडक निर्बंध - कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार डॉ. अभिजित जाधव श्री दत्त इंडिया साखर कारखान्याकडून सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसाच्या बिलापोटी प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे रक्कम वर्ग - मुख्य प्रशासनाधिकारी अजितराव जगताप यांची माहिती ५६ गावांत ३२ विषयांवर प्रवचनांची यशस्वी मालिका; भारतीय बौद्ध महासभा फलटण शाखेचा वर्षावास सांगता समारोह उत्साहात संपन्न आपली फलटण मॅरेथॉनच्या माध्यमातून डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी लोकांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची : रणजितसिंह नाईक निंबाळकर शेतकरी-जनावरांचा पाण्यासाठी टाहो, नेत्यांना पाहिजे घुंगरांचा खणखणाट! शेतकरी पाणी - चाऱ्यासाठी हवालदिल, नेते मात्र लावणीच्या तालावर दंग सांगलीतील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत फलटण वकील संघाची चमकदार कामगिरी; सातारा जिल्हा गुणतालिकेत प्रथम आधी रेट बघा मग खरेदी करा! सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आणि एस.एस. मोबाईलमध्ये दसरा-दिवाळीनिमित्त बंपर ऑफर्सची पर्वणी माळजाई देवीची महाआरती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार - प्रमोद निंबाळकर यांची माहिती भाजपला दिलेला पाठिंबा ॲड. कांचन खरात यांनी घेतला मागे; स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू ठेवणार संविधान व घटनात्मक संस्थांच्या संरक्षणासाठी ॲड. कांचन खरात यांचे निवेदन; निष्पक्ष चौकशीची मागणी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू ते दमदार पत्रकार - शक्ती भोसले विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त भव्य दांडिया स्पर्धा; लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांच्या देवीच्या गोंधळाचे आकर्षण कै. श्रीराज दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिर परिसरात वॉटर कुलर भेट सिद्धी अबॅकस अकॅडमीचा राज्यस्तरीय स्पर्धेत डंका ; १२३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी ₹३ हजारांची लाच; मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे मंगळवार ६ ऑक्टोबरला भव्य आयोजन महिला व मुलींना मोठी संधी : मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स उत्तम मानसिक आरोग्य हीच खरी धनसंपदा : डॉ. दीपक राऊत सोनार समाजाचा सर्व शाखीय राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती

कराड शहर अंतर्गत वाहतुकीत बदल

satara
टीम : धैर्य टाईम्स

 सातारा दि. 3 :  भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग यांच्यावतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर सहा पदरीकरण प्रकल्पाचे काम सुरु असुन कराड व मलकापूर ता. कराड या दरम्यान असलेला उड्डाणपुल काढुन टाकण्यात येणार आहे. यासाठी वाहतुकीत बदल करुन अंतर्गत वाहतुक व्यवस्था सुरळीत राहण्याकरीता पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी  महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये दि. 5 फेब्रुवारी 2023 चे ००.०१ वा. पासुन पुढील आदेश होईपर्यंत खालील वाहतुक मार्गात बदल केला आहे.

कोल्हापुर कडुन सातारा बाजुकडे जाणारी वाहतुक ढेबेवाडी फाटयावरील ओव्हरब्रिज कराड बाजुस ज्या ठिकाणी संपतो तेथे पश्चिमेकडील सेवारस्त्यावर वळविण्यात येणार आहे. कोल्हापुरहुन कराडमध्ये येणारी वाहने हि एकेरी वाहतुकीने वारुंजी फाटा पर्यंत येतील तेथुन पुढे  जड वाहतुक ही वारुंजी फाटा येथुन हॉटेल पंकज समोरुन सेवारस्त्यामार्ग महात्मा गांधी पुतळयासमोरुन कराडमध्ये जाईल. हलकी वाहतुक ही वारुंजी फाटा येथुन जुना कोयना ब्रिज मार्गे कराडमध्ये जाईल. 

कराड शहरा मधुन कोल्हापुर नाका येथे बाहेर पडणाऱ्या वाहनासाठी ) कोल्हापुर बाजुकडे जाण्यासाठी सेवारस्ता मार्गाचा वापर करुन जाता येईल.  कराडमधुन सातारा कडे जाणारी वाहने भादी हार्डवेअर समोरुन उजवीकडे यु-टर्न घेवुन नंतर इंडिअन ऑइल पेट्रोलपंपाजवळ सर्विसरोडला मिळणार आहेत. 

सातारा ते कोल्हापुरकडे जाणारी वाहतुक हॉटेल पंकज समोरुन पश्चिमेकडील कोल्हापुर सातारा लेनवर वळविण्यात येईल व कोल्हापुर नाक्यावरील ब्रिज संपलेनंतर पुर्वेकडील सेवारस्त्यावर एकेरी मार्गाने घेण्यात येईल कृष्णा हॉस्पिटल समोरील ब्रिजसंपल्या  नंतर गंधर्व हॉटेलजवळ वाहतुक पुर्ववत महामार्गावर घेण्यात येईल. 

सातारा कडुन कोल्हापुरकडे (वारुंजी फाटा ते गंधर्व हॉटेल) व कोल्हापुर कडुन साताराकडे (कोयना वसाहत ते वारुंजी फाटा) जाणारी वाहतुक हि एकेरी वाहतुक असल्याने विरुद्ध दिशेने वाहने चालविण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच सदर मार्गावर कोणत्याही प्रकारची वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे. 

कराड बाजुकडुन ढेबेवाडीकडे जाणारी वाहतुक हि कोल्हापुर नाका ते ढेबेवाडी फाटा पर्यंत एकेरी मार्गाने ढेबेवाडी फाटापर्यंत जावुन ब्रिज खालुन ढेबेवाडीकडे जाईल. ढेबेवाडी बाजुकडुन कराड शहराकडे येणारी वाहतुक हि ढेबेवाडी फाटा येथुन पश्चिमेकडील सेवारस्त्याने वारुंजी फाटा मार्गे कराडमध्ये येईल. जड वाहतुक (ओडीसी वाहने) हि फक्त रात्रीच्या वेळी वाहतुकीस परवानगी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोल्हापुर नाका ते पंकज हॉटेल यामार्गावर असणारा भुयारी मार्ग बंद राहील. तरी कराड मधील वाहतुक मार्गातील बदलासाठी सर्व नागरीकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. शेख यांनी केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER