फलटण | दि. 24 एप्रिल 2025 |
तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीमध्ये संपन्न होणाऱ्या फलटण तालुक्यातील सर्वच्या सर्व 131 ग्रामपंचायतींची सरपंचपद आरक्षण सोडत सजाई गार्डन येथे प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली, तहसिलदार डॉ. अभिजीत जाधव, निवासी नायब तहसिलदार अभिजीत सोनवणे, नायब तहसिलदार तुषार गुंजवटे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
लोकसंख्येनिहाय व पूर्वी झालेल्या आरक्षण सोडतीच्या आधारे सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
यामध्ये येणाऱ्या निवडणूका या लोकनियुक्त सरपंच म्हणून संपन्न होणार आहेत. राज्यशासन व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सन 2025 ते 2030 या कालावधीमध्ये होणाऱ्या निवडणूकांची सरपंचपदाची आरक्षण सोडत संपन्न झाली.
सर्वसाधारण – सांगवी, गिरवी, खटकेवस्ती, सुरवडी, सासकल, होळ, कुरवली बु. दत्तनगर, विडणी, वडगांव, वडगांव, कापडगांव, सोनवडी खुर्द, टाकळवाडे, कोळकी, मुरुम, दुधेबावी, बिबी, पिंप्रद, शेरेचवाडी (हिंगणगाव), तिरकवाडी, नांदल, मिरढे, फडतरवाडी, चव्हाणवाडी, वाठार निंबाळकर, कोरेगांव, जाधववाडी (आसू), वडजल, मुळीकवाडी, मिरेवाडी दालवडी, कोऱ्हाळे, डोंबाळवाडी, विठ्ठलवाडी, मानेवाडी, जाधवनगर, दऱ्याचीवाडी, सावंतवाडी, उळंब, गोळेगांव
सर्वसामान्य महिला – जावली, ढवळ, भिलकटी, झिरपवाडी, साखरवाडी, भाडळी खुर्द, कुलवली खुर्द, शिंदेवाडी, आळजापूर, वडले, चौधरवाडी, आंदरुड, खराडेवाडी, सोमंथळी, कांबळेश्वर, कापशी, आरडगांव, अलगुडेवाडी, रावडी खुर्द, काळज, ताथवडा, तडवळे, चांभारवाडी, सालपे, सासवड, तावडी, जाधववाडी (फलटण), मिरेवाडी (कुसुर), शेरेचीवाडी (ढवळ), घाडगेवाडी, माळेवाडी, ढवळेवाडी (निंबळक), पिराचीवाडी, टाकुबाईचीवाडी, माझेरी, परहर बु.॥, परहर खुर्द, जोर (वाखरी).
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओ.बी.सी.) –
शिंदेमाळ (महिला), मिरगांव (महिला), मलवडी, धुळदेव (महिला), खडकी (महिला), कुसुरु, ठाकुरकी (महिला), उपळवे, पाडेगांव, बरड (महिला), आदर्की बु.॥, रावडी बु.।।, सोनवडी बु.।। (महिला), साठे, वाखरी (महिला), तरडगांव (महिला), तरडफ, हिंगणगाव, शेरेशिंदेवाडी (महिला), राजाळे, गोळेवाडी (महिला), काशिदवाडी (महिला), भाडळी बु.॥ (महिला), जोर (कुरवली खुर्द), मठाचीवाडी, नाईकबोमवाडी, वाघोशी, धुमाळवाडी (महिला), तांबवे (महिला), झडकबाईचीवाडी (महिला), बोडकेवार्ड (महिला), घाडगेमळा, फरांदवाडी (महिला), आदर्की खुर्द, सोनगांव.
अनुसूचित जमाती (एस.टी.) – ढवळेवाडी -(आसू).
अनुसूचित जाती (एस.सी.) – सोनगांव, साठे, सांगवी, जिंती, पवारवाडी (महिला), वेळोशी, गोखळी, विंचुर्णी (महिला), आसू (महिला), मुंजवडी (महिला), सरडे, दालवडी (महिला), शिंदेनगर (महिला), गुणवरे, खुंटे (महिला), राजुरी – भवानीनगर (महिला), निंबळक वाजेगांव, हणमंतवाडी (महिला), निरगुडी मांडवखडक, सस्तेवाडी (महिला).
वरील प्रमाणे सन 2025 ते 2030 अखेर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत संपन्न झाली आहे.