फलटण प्रतिनिधी -
फलटण तालुक्यातील एकमेव कन्याशाळा असा नावलौकिक असलेल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणचे सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटणचे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केले आहे.
कन्याशाळा इयत्ता बारावी कला शाखेचा निकाल ८७.१४% हा फलटण शहरातील सर्वाधिक निकाल आहे, तर इयत्ता दहावीचा निकाल ९६.३४% लागला आहे.
एच. एस. सी. परीक्षा २०२५ मध्ये प्रथम क्रमांक कु. माने भाग्यश्री शेखर (७६.००%) द्वितीय क्रमांक कु. मदने मेघा शामराव (७३.८३%) व तृतीय क्रमांक कु. धायगुडे शिवांजली नानासो (७२.३३%) यांनी मिळवून उज्ज्वल यश संपादन केले.
एस. एस. सी. परीक्षा २०२५ मध्ये प्रथम क्रमांक कु. शेख फिजा फिरोज (९०.२०%) द्वितीय क्रमांक कु. आटोळे प्रगती बाळासो (९०.००%) तृतीय क्रमांक कु. निषाद रोशनी मेवालाल (८९.८०%) यांनी मिळवून उज्ज्वल यश संपादन केले.
फलटण शहरातील व ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थिनी आपल्या विद्यालयात प्रवेश घेतात. श्रीराम एज्युकेशन सोसायटी या विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. विद्यालयात दिव्यांग विद्यार्थिनींना विशेष मार्गदर्शन केले जाते.
सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या अध्यक्षा श्रीमती सविता काकी सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), ऑनररी जनरल सेक्रेटरी डॉ. श्री. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाचे सदस्य श्री. महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी बेडके, सौ. ज्योती सचिन सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. मोदी सर व श्री. सी. एल. पवार सर, नियमक मंडळाचे सर्व सदस्य तसेच प्रशालेच्या प्राचार्या सौ. सुरवसे व्ही. के., पर्यवेक्षिका, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.