Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी

तुम्ही दिलेल्या मतांची किंमत विकास कामातून दाखवून देईन - सरपंच सागर अभंग

टीम : धैर्य टाईम्स

आमदार रामराजे नाईक निंबाळकर व एका माजी आमदाराच्या मुलाने व्यावसायिक अडचणीत आणत माझा मोठा घातपात घडवून आणण्याची शक्यता असताना आमदार जयकुमार गोरे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्यामुळेच आपण सही सलामत बचावलो - सागर अभंग 

विडणी ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये यश संपादन केल्यानंतर केवळ दोन महिन्याच्या कालावधी मध्येच तब्बल 23 कामांचे भूमिपूजन आज होत आहे. काही दिवसातच गावातील  रस्त्यांची कामेही सुरू होतील. विडणी गावातील काही लोकांनी राजकीय स्वार्थासाठी लावलेले आपापसातील वाद आपण सामाजिक एकोप्यातून मिटवून संपूर्ण गाव सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवून गुण्या गोविंदाने एकत्र करू असा विश्वास व्यक्त करतानाच तुम्ही माझ्यावर ठेवलेला विश्वास व तुम्ही दिलेल्या मतांची किंमत विडणी गावच्या विकासातून दाखवून देईन असा विश्वास विडणीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी व्यक्त केला. ते विडणी (फलटण )येथे झालेल्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संपर्क दौऱ्याच्या आभार सभेत बोलत होते.

यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. नरसिंह निकम, माजी पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील, विठ्ठल नाळे, सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, उपाध्यक्ष तुकाराम ढमाळ, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, अनुप शहा, सचिन अहिवळे, जाकीर मणेर, शहराध्यक्ष अमोल सस्ते, निंभोरेच्या सरपंच कांचन रणवरे, बाळासाहेब ननावरे, तुकाराम शिंदे, अमित रणवरे, सचिन ननावरे, भाजपा महिला आघाडीच्या सौ. उषा राऊत, विडणी ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित होते.

 पुढे बोलताना सरपंच सागर अभंग म्हणाले की, विडणी गावातील मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून सत्ता परिवर्तन करत माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. निवडणूक प्रचारा दरम्यान अतिशय खडतर प्रवासातून विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह त्यांचे दोन्ही बंधू व त्यांची मुले सुद्धा विडणी येथे प्रचार सभेसाठी येत होती मात्र मतदारांनी माझ्यावर विश्वास देत मोठ्या राजकीय शक्तीला आसमान दाखवण्याचं काम केल्याचं अभंग यांनी निदर्शनास आणून दिले.

 विडणी मधील विविध 53 कामे मंजूर असून त्यापैकी आज 23 कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. 32 कोटी 80 लाख रुपयाच्या पेयजल योजनेच्या माध्यमातून विडणीला प्रति माणसे 55 लिटर पाणीपुरवठा येणाऱ्या काळात करण्यात येणार आहे. तर या योजनेचा बॅलन्सिंग टॅंक एक कोटी 30 लाख लिटर असल्याने भविष्यातील विडणीचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटल्याचे सरपंच सागर अभंग यांनी निदर्शनास आणून देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विशेष आभार मानले.

 विडणी करिता बरड ऐवजी कोळकी फिडरवरून वीज प्रवाह मिळावा, गावठाण विस्तार व्हावा, सुसज्ज व्यायाम शाळा, विडणी प्राथमिक आरोग्य केंद्र निर्मिती व्हावी या मागण्या यावेळी सरपंच सागर अभंग यांनी खासदार रणजितसिंह यांनी पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.

 आमदार रामराजे नाईक निंबाळकर व एका माजी आमदाराच्या मुलाने व्यावसायिक अडचणीत आणत माझा मोठा घातपात करण्याची शक्यता असताना आमदार जयकुमार गोरे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्यामुळेच आपण सही सलामत बचावलो असल्याचे अभंग यांनी सांगितले.

केवळ रस्ते, पाणी, वीज हे प्रश्न सोडवून चालणार नाही तर गावातील प्रत्येक माणसाचा विकास करण्याचे आपले ध्येय असल्याचे शेवटी सागर अभंग यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER