Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

एम. आय. डी. सी. संदर्भात सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलवा : आ. रामराजे

औद्योगिक वसाहत म्हसवडलाही करा आणि उत्तर कोरेगावला करा
टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी : दिल्ली- मुंबई कॉरिडॉरप्रमाणे केंद्र सरकारने बेंगलोर बॉम्बे इंडस्ट्रियल कॉरिडॉर धर्तीवर कोरेगाव तालुक्यातील सोळशीसह सहा गावांमध्ये तसेच म्हसवड, ता. माण येथेही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहती विकसीत करा. त्यासाठी सर्व संबंधित लोकप्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी. ते जो निर्णय घेतील तो आम्हास मान्य असेल, अशी लक्षवेधी आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेत मांडली. त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लवकरच बैठक घेण्याची ग्वाही दिली व प्रस्तावित एमआयडीसी जिल्ह्याबाहेर जाणार नाही असे सागितले.

औद्योगिक वसाहत म्हसवडलाही करा आणि उत्तर कोरेगावला करा

यावेळी आ. रामराजे म्हणाले की, बेंगलोर- बॉम्बे इंडस्ट्रियल कॉरिडॉर या विषयात कोणताही राजकीय वास न घेता जर निर्णय घेतला तर आमच्या जिल्ह्याचे कल्याण होणार आहे. म्हसवड एमआयडीसीला माझा विरोध नाही. आमचे उत्तर कोरेगाव हे जे लोकेशन आहे, हे जर केंद्र सरकारला पटत असतील तर कॉरिडॉर तिकडे करा. पण तितक्याच ताकतीचा कॉरिडॉर म्हसवडला राज्यातून करून द्या, एकच कॉरिडॉर दोन्हीकडे व्हायला पाहिजे आहे. जो निर्णय केंद्रीय मंत्री सीतारामन यांच्या समोर झाला तो पुढे गेला तर बरं होईल. मी तुम्हाला माझ्याकडे ग्रामपंचायतीचे ठराव असलेले निवेदन पाठवून देतो, तिथे भूसंपादन होतं, तेव्हा काही लोक म्हणतात आम्हाला द्यायचे नाही, काही म्हणतात द्यायची आहे. मला भीती एकच वाटते की, या गोंधळात कॉरिडॉर सांगली किंवा सोलापूरला जाईल. म्हसवड हे शंभर किलोमीटर आत आणि उत्तर कोरेगाव हे सहा किलोमीटर आहे. परंतु मी म्हणणार नाही की म्हसवडला करू नका, म्हसवडलाही करा आणि उत्तर कोरेगावला करा. निर्णय फक्त केंद्र सरकारने घ्यावा. जर अडचण होणार असेल, काही राजकीय तिडा होणार असेल तर मुख्यमंत्र्यांनी फलटण व माणमधील सर्व लोकप्रतिनिधी एकत्र करून मीटिंग घ्यावी. जो निर्णय मुख्यमंत्री घेतील तो आम्हाला मान्य राहील.

प्रस्तावित एमआयडीसी जिल्ह्याबाहेर जाणार नाही : ना. उदय सामंत 

यावर बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, कोरेगाव तालुक्यातील सोळशी आणि परिसरातील गावांमध्ये जो कॉरिडॉर होणार आहे. त्या जागेवर करावा, असे मत आ. रामराजे नाईक निंबाळकर यांचे होते. याबाबत अनेक वेळा माझी आणि त्यांची चर्चा झाली आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्याबरोबर ही बैठक झालेली आहे ते देखील खरं आहे. त्याच्यामध्ये कुठेही वावगे नाही. परंतु ज्या पद्धतीने आ. रामराजे यांच्याकडे काही पत्रव्यवहार झाले आहेत. त्याच पद्धतीचे काही पत्रव्यवहार ग्रामपंचायतीने एमआयडीसी बरोबर केले आहेत. त्यामुळे इथं कोणताही राजकीय हस्तक्षेप किंवा दबाव असण्याचं काही कारण नाही. म्हसवड हा प्रपोजल केंद्र शासनाकडे गेला आहे. पण केंद्र शासनाने अजून तो मंजूर केलेला नाही. मुख्यमंत्री यांच्याबरोबर एक महिन्याच्या आत बैठक घेण्यात येईल. सातारा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विकसित करण्याचा राज्य शासनाचा मानस असला, तरी येथील प्रस्तावित एमआयडीसी जिल्ह्याबाहेर जाणार नाही, अशी ग्वाहीही उदय सामंत यांनी दिली.

आपल्यातला खरा विश्वासघातकी कोण ?

उत्तर कोरेगावमध्ये कॉरिडॉर व्हावा म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न केला. परंतु कॉरिडॉर अखेर माण तालुक्यामध्ये गेला असल्याचे समजते. मात्र आपण हार मानायची नाही, सत्तेपुढे शहाणपण नाही पण आपल्यातला खरा विश्वासघातकी कोण आहे हे ओळखण्याची गरज असल्याचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या व्हॉटसअप स्टेटसवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, कॉरिडॉरसंबंधी खासदारांची भूमिका काय? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या धर्तीवर बँगलोर-मुंबई आर्थिक कॉरिडॉर करीता उत्तर कोरेगाव हे लोकेशन केंद्र सरकारला योग्य वाटत असेल तर कॉरिडॉर तिकडे करा. पण तितक्याच ताकदीचा कॉरिडॉर राज्यातून म्हसवडला करून द्या, अशी मागणी महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी लक्षवेधीमार्फत शुक्रवारी विधान परिषदेत केली होती. त्यानंतर आ. रामराजे यांनी आपल्या मोबाईलच्या व्हॉटसअॅप स्टेटसला पोस्ट टाकत आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगीकरण करणार असून यासाठी लवकरच मिटिंग बोलवणार आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, आवाहनही त्यांनी केले आहे. माण तालुक्यातील कॉरिडॉरला आमचा बिलकुल विरोध नव्हता. मात्र दोन्ही ठिकाणी कॉरिडॉर झाले असते तर सातारा जिल्ह्यांमध्ये मोठी औद्योगिक क्रांती झाली असती व जिल्ह्याच्या प्रगतीला मोठा हातभार लागला असता असेही आ. रामराजे यांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER