Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा

स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियान

टीम : धैर्य टाईम्स
स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्मार्ट भौतिक पायाभूत सुविधा, स्मार्ट मनुष्यबळ, स्मार्ट संदर्भसेवा, स्मार्ट माहिती व तंत्रज्ञानाचा वापर व पर्यावरण संतुलित स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र या बाबींचा समावेश असणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य विषयक 2017च्या धोरणानुसार सर्व नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्यस्तर प्राप्त करुन देणे क्रमप्राप्त आहे. या धोरणानुसार सार्वजनिक आरोग्य सेवेचा दर्जा उंचाविला तर नागरिकांना मोठ्या समप्रमाणात आरोग्य सेवा प्राप्त करुन घेता येणार आहेत.  सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत दर्जेदार गुणवत्तापूर्वक सर्व सामवेशक सेवा देण्यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट करण्याची संकल्पना राबविण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट करताना भौतिक सुविधांमध्ये बदल करणे, अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण व सक्षमीकरण करणे व नियमावली नुसार शिष्टाचार सेवा प्रदान करणे यावर भर देण्यात येणार आहे.

स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्मार्ट भौतिक पायाभूत सुविधा, स्मार्ट मनुष्यबळ, स्मार्ट संदर्भसेवा, स्मार्ट माहिती व तंत्रज्ञानाचा वापर व पर्यावरण संतुलित स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र या बाबींचा समावेश असणार आहे.

रुग्णसेवा दर्जेदार होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील पायाभूत सुविधांमध्ये एकसमान बदल करणे, आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी जनतेचा सहभाग वाढविणे, आरोग्य संस्थांमधील उपलब्ध यंत्र व साधनसामुग्री रुग्णसेवेसाठी अद्यावत करणे व आरोग्य संस्थांमध्ये नैसर्गिक समतोल राखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे हे या अभियानाचा उद्देश आहे.

पायाभूत भौतिक सुविधा : यामध्ये विविध मानांकनानुसार विविध कक्षामध्ये पायाभूत सुविधांमध्ये बदल करणे, सोलर एनर्जीचा वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, आयुष-हर्बल गार्डन, रुग्ण अनुकूल वातावरण.

यंत्रसामुग्रीची देखभाल : दर्जेदार रुग्णसेवेसाठी आवश्यक साधनसामुग्री, रुग्णालयातील साधनसामुग्रीचे नियमावली नुसार देखभाल करणे, साधनसामुग्रीचे एएमसीद्वारे देखभाल करणे. तसेच मनुष्यबळाचे विविध प्रशिक्षणाद्वारे सक्षमीकरण (सॉफ्टवेअर व टेक्निकल) करण्यात येणार आहे.

सर्वसमावेश दर्जेदार आरोग्य सेवा : आरोग्य संस्थेमध्ये निर्देशकांची उपेक्षित पातळी गाठण्यासाठी सनियंत्रण व मुल्यमापन व पाठपुरावा. तत्पर अत्यावश्यक सेवा व तत्पर संदर्भ सेवा.

जनसहभाग : आरोग्य सेवामध्ये जनतेचा सहभाग वाढविणे. सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत जनसहभाग वाढविण्यासाठी रुग्ण व नातेवाईकांचे अभिप्रायानुसार आरोग्य सेवा पुरविणे.

जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद स्वनिधी, सीएसआर, राष्ट्रीय आरोग्य अभियान, स्थानिक विकास निधी, सेवाभावी संस्था, 15 वा वित्त आयोग व लोकसहभाग या माध्यमातून भौतिक सुविधा परिपूर्ण करण्यात  येणार आहेत.

प्रसतिगृह, शस्त्रक्रियागृह, बाह्य रुग्ण विभाग, आंतर रुग्ण विभाग, प्रयोगशाळा, औषध भांडार, संगणक कक्ष, सोलर उर्जा वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्वागत कक्ष, अंतर्गत रस्ते, सरंक्षण भिंत, परिसर सुशोभिकरण, आयुष गार्डन, कॅटल ट्रॅप व प्रसाधनगृह या भौतिक सुविधा अपेक्षित आहेत.

स्मार्ट प्रसतुतिगृह : यामध्ये अत्याधुनिक लेबर टेबल, अत्याधुनिक शॅडोलेसर लॅम्प, कॅबिनेट फॉर औषधे व सामुग्री, इन्स्ट्रुमेंट ट्रॉली, बेबी वॉर्मर, सक्शन मशिन, स्ट्रेचरल विथ ट्रॉली, व्हिल चेअर व स्वतंत्र प्रसाधनगृह अशा सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.

शस्त्रक्रिया गृह : अत्याधुनिक शॅडोलेस लॅम्प, अत्याधुनिक ओ.टी. टेबल, इन्स्ट्रुमेंट ट्रॉली, ऑटोक्लेव्ह, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, ट्युबेकटॉमी किट, स्टरलायजेशन किट, स्टरलायजेशन संच तसेच शस्त्रक्रियागृहामध्ये अँटीमायक्रोबियल (प्रतिजैविक) पॅनेलचा वापर अत्याधुनिक तापमान व आद्रता नियंत्रणप्रणाली उभारण्यात येणार आहे.

आंतररुग्ण विभाग : एकसारखे सेमी फाऊलर बेड, मॅट्रेससह, एकसमान नर्सिंग स्टेशन, स्वतंत्र सुसज्ज आल्हाददायी वातावरण, एकसमान बेड साईड लॉकर, एकसारखे दोन बेडमधील पडदे व एकसारखे दिवसनिहाय स्वच्छ व आकर्षक बेडशिट, स्वतंत्र व स्वच्छ  प्रसाधनगृह.

प्रयोगशाळा : कलरी मिटर, ग्लुको मिटर, बायनाक्युलअर मायक्रोस्कोप, आऊटसोरसिंग लॅब (एचएलएल), तपासणीसाठी लागणारे रसायने व द्रव्य यांची उपलब्धता व पुरवठा यावर ई-औषधीसारख्या तंत्रज्ञानाद्वारे नियंत्रण ठेवले जाणार आहे. या प्रयोगशाळेत टी.बी., डेंग्यु, मलेरिया, बायोमिस्ट्री व हिमॅटॉलॉजी या प्रकारच्या तपासण्या केल्या जाणार आहेत.

स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियानांतर्गत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अत्याधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.

संकलन

जिल्हा माहिती कार्यालय, सातारा.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER