Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

आजही सैराटची गाणी वेड का लावतात?

टीम : धैर्य टाईम्स

मराठी सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडणार्‍या नागराज मंजुळेंच्या सैराटला पाच वर्ष झालीत. त्यातल्या लवस्टोरीनं अनेकांना भुरळ घातली. अनेकांना त्यातलं सामाजिक वास्तव भावलं. पण सिनेमातली गाणीही फक्त सुपरहिट नाही तर ट्रेण्डसेटर ठरली. कारण ती खर्‍या अर्थाने ग्लोबल आहेत. शब्द, भाषा आणि सुरांचीही कुंपणं ओलांडून हे संगीत जगाला भिडतं.
’लंगड्या, तुजं मला काय बी ऐकायला यत न्हाय’ म्हणणार्‍या परशाला आर्ची आली आर्ची हे शब्द मात्र बरोबर ऐकायला येतात. तेव्हा कसलाही विचार न करता बोटीच्या एका टोकावरून स्वत:ला तो समुद्रात झोकून देतो. जणू ये इश्क नही आसान बस इतना समझ लिजिये या ओळींचीच याद यावी.
पक्ष्यांचं आभाळाकडं झेप घेणं असो, बॅकग्राऊंडला वाद्यांचं उत्कंठा वाढवणारं संगीत असो की आर्चीच्या एका झलकसाठी व्याकुळ झालेल्या परशाचं अथांग सागरातून वाट काढत किनार्‍याकडं झेपावणं असो. इच्छितस्थळी पोचण्याची उत्सुकता नेमकी कुणाला लागलीय त्याचा अंदाज लावणं कठीणच.
मंग्याच्या हिरीवरनं समद्या पोरास्नी आर्चीनं तानून लावलं अशी आर्चीची तक्रार करणार्‍या मित्राकडून परशाला एवढंच कळलं की आर्ची मंग्याच्या विहिरीकडे आहे. मग काय, चेहरे पे मुस्कान और दिल में लाखो तुफान घेऊन पाखरांच्या वेगाने, ओलेत्या अंगाने, अनवाणी पायाने परशा पळतच सुटतो.
एकीकडे समुद्रातून बाहेर आलेला परशा तर त्याचवेळी दुसरीकडे हात वर करून पूर्ण कपड्यातल्या आर्चीने उंच पायर्‍यांवरून विहिरीत मारलेली उडी! आर्चीच्या त्या उडीने नदीत, विहिरीत असलेली हिरोईन मादकच दिसते, असते या आपल्या पूर्वापार संस्काराच्या पार चिंधड्या उडवल्या राव.
हेही वाचा: टू डेज वन नाईट: बेरोजगार कुटुंबाची जागतिक गोष्ट
समुद्र पार करून आलेला परशा आता आर्ची पहायला मिळणार या एका आशेपायी घरी येऊन डोक्यावर चक्क पाणी ओतून घेतो! आणि याड लागलं गं याड लागलं गं, रंगलं तुझ्यात याड लागलं गंची धून सुरू होते. तीच्यासाठी परशाचं सजणं त्याच्या लहान बहिणीच्या नजरेतूनही सुटत नाही. पण चाखलंया वारं ग्वाड लागलं गं म्हणत विहिरीकडं निघालेल्या परशाला शर्ट घालायला तरी घरात कुठं वेळ आहे.
धावत्या मालगाडीच्या पार्श्‍वभूमीवर आनंदाच्या उकळ्या फुटल्यासारखं स्लो मोशनमधे एकट्यानेच परशाला बेधुंद नाचताना पाहून जाणवतं की प्रेमात आकंठ बुडालेल्याचं नाचणंही किती लोभसवाणं असतं! तेवढ्यात कुठूनतरी एक फूलपाखरू परशाच्या आजूबाजूला भिरभिरत येतं. तेच फूलपाखरू उसाच्या नी केळीच्या शेतातून परशा येणार असल्याची वर्दी देत निघूनही जातं.
हे असं प्रेमात असलेल्याचं फूलपाखरू झालेलं पाहणं म्हणजे दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीचा अत्युच्च आविष्कारच म्हणायला हवा मग भलेही ते फूलपाखरू एडिट केलेलं का असेना! शेतात एकट्यानेच बेधुंद नाचणारा परशा माणसांमधे आल्यावर मात्र लोकांच्या नजरा चुकवत, मनातली चलबिचल लपवत चालत राहतो. पण नीट न्याहाळून पाहिली तर त्याची ही दोन्ही रूपं रविराज कटिंग सलूनच्या तडा गेलेल्या काचेतूनही दिसतात. आणि काचेसारखं निर्विकार चेहर्‍याने पाहत असलेलं रविराज नामक जगही!
’सांगवना, बोलवना, मन झुरतया दुरून’ च्या तालावर पुन्हा उसाच्या तुर्‍यांमधून पाखरांसंगं उडत जाणारा परशा, त्याचं ते गोंधळलेलं मन लाजं-काजंला बाजूला सारून पाकीट, घड्याळ मित्राकडं भिरकावून देतं आणि ओढ लागली, मनात कालवाया लागलं म्हणत विहिरीकडं धाव घेतं. तेव्हा हरभरा खायच्या तयारीत असलेला मित्रही बघतच राहतो.
आणि परशा एकदाची विहिरीच्या कड्यावरून मस्तमौला उडी मारतो. जिच्यासाठी एवढा आटापिटा केला तिला एकटक पाहतच पाण्यात पडतो. समुद्रात हात पाय लांब करून पट्टीचा सूर मारणारा परशा विहिरीत मात्र गुडघ्यात पाय मुडपून, हात पसरून उडी मारतो हे विशेष!
बघितलंच न्हाय म्हणत त्याचं ते लडिवाळ खोटं खोटं बोलणं, बरा डोळं झाकून हिरीत पडलास म्हणत तिचं बेदरकार उत्तर, आता बघितलंस ना म्हटल्यावर त्याचं ते मनातल्या मनात गुदगुल्या झालेलं मान डोलावणं आणि त्यावरही कडी करत तिने त्याला फटकारणं! बासरीच्या आर्त स्वरांच्या पार्श्‍वभूमीवर त्या दोघांमधे प्रत्यक्ष झालेला पहिला संवाद आणि एकमेकांचे श्‍वासही ऐकता येतील एवढ्या जवळून झालेली प्रत्यक्ष नजरभेट!
खरंतर पोरींचा रस्ता अडवून धरायची आपली दीर्घ परंपरा पण इथे आर्चीचं परशाला वाट मोकळी करून देणं लक्षात राहतं. आणखी एक, परशा पायर्‍यांकडे येताना पायर्‍यांजवळ आर्चीच्या चार मैत्रिणी दिसतात. पण पुढच्याच सीनमधे परशा पायर्‍या चढताना मात्र तिघीच असल्याचं दिसतं, हे मात्र खटकतं जरूर! असो.
जग जिंकलेल्या अलेक्झांडरचं हसू घेवून परशा तिथून बाहेर पडतो तर अचानक या कोसळलेल्या वीजेने आर्चीही त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे खुळ्यासारखी पाहतच राहते आणि चमचमत्या पाण्याच्या प्रकाशात तिचा चेहरा अधिकच खुलून दिसतो! कॅमेरेवालेदादा, मानलं तुम्हाला! काय म्हणली रं आर्ची? हे मित्रांनी विचारताच ’बाहेर हो म्हणली’ हे परशा इतक्या सहज सुंदरतेने बोलून जातो की तिचं हुसकावून लावणंसुध्दा त्याला किती हवंहवंसं वाटतं, याची साक्ष पटावी.
बाहेर हो म्हणली हे तीन शब्द म्हणजे या गाण्याच्या संपूर्ण चित्रीकरणातला मास्टर पीसच! म्हटलं तर नुसतं विहिरीतून बाहेर हो किंवा ज्याच्यात उडी मारू पाहतोस त्यातूनही बाहेर हो हा गर्भित अर्थही दडलाय असं जाणवतं!
हेही वाचा: वाफाळलेले दिवसः वयात येणार्‍या पाल्यांसोबत पालकांनी बघावा असा अभिवाचनाचा प्रयोग
तिच्या नजरभेटीत चिंब भिजूनही आतला जाळ काही केल्या सुलगना. देखणं हे, दुखणं गं कॅरमबोर्डचा पाळणा करून एकलंच हाय साथीला म्हणत त्यावर कपडे सुकवतयं. एकलेपणाच्या वातीला पाजळून मनाच्या काजळीला कधी उजळवून टाकतंय तर कधी चांदणीलाच आवतान धाडतंय.
तिचं सपान आता जागवाय लागलं हे जसं कळलं नाही तसं तिच्याच विचारांच्या थव्यांनी आभाळ पांघराया लागलं हे ही कळलं नाही. मग माशांचं जाळं घेऊन पहाटे पहाटे घराकडे धाव घ्यावी लागली. आणि सकाळी पाहतो तर काय. बंदुकीच्या आकाराची चावी लावून, तलवारीच्या पात्यावर नंबरप्लेट असलेली, गडद निळ्या रंगातला ड्रेस ल्यालेली, गॉगल लावून ऐटीत बसलेल्या रूबाबदार आर्चीची बुलेटवरची एन्ट्री! कडक शिस्तीच्या एनसीसी कॅडरला मान वळवायला लावणारी, गावातल्या टग्या नजरेंनाही क्षणभर अवाक् करणारी, निस्तेज डोळ्यातल्या एखादीलाही अभिमान वाटायला लावणारी अशी ती एण्ट्री कुणाला याड नाही लावणार?
याड लागलं हे गाणं म्हणजे गायक, गीतकार, संगीतकार, कलाकार, कॅमेरामन, दिग्दर्शक आणि एडिटर यांच्या मेहनतीचं, कलागुणांचं अनोखं प्रदर्शनच आहे! आवर्जून उल्लेख करावा ते म्हणजे 66 वाद्यवृंदकांनी मिळून वाजवलेली ट्रंपेट, सेक्साफोन, ब्रास, व्हायोलीन, क्लेरीनेट, बासरी, वीणा इ. वाद्यं आणि त्यातून तयार झालेलं हे सिंफनी ऑर्केस्ट्राबेस मेलडियस साँग!
आंतरराष्ट्रीय महोत्सवात दाखवला की मराठी सिनेमा ग्लोबल झाला असं म्हणायचं की यूट्यूबवरच्या या गाण्याचं रेकॉर्डिंग पाहिल्यावर तो खर्‍या अर्थाने ग्लोबल झाला असं म्हणायचं हे ज्याचं त्यानं ठरवावं. पण एकदा तरी या गाण्याचं यूट्यूबवरचं रेकॉर्डिंग अवश्य पहा. याड लागलं या गाण्याची पडद्यामागची अतोनात धडपड नी पडद्यावरची आल्हाददायक धडधड पाहिली की एकच वाक्य मनात येत राहतं याड लागावं तर ते अस्सं!

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER