Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

जिल्हास्तरीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्यु. कॉलेजचे उज्वल यश

टीम : धैर्य टाईम्स

फलटण :

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा , मुधोजी हायस्कूल व ज्यु.कॉलेज फलटण तसेच द हॉकी सातारा व फलटण तालुका क्रीडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय नेहरू चषक हॉकी स्पर्धा श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकुल, फलटण येथे संपन्न झाल्या.


या स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज च्या १५ वर्षाखालील मुलांच्या संघाने तसेच १७ वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या संघाने विजेतेपद पटकवले.

१५ वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये अंतिम सामन्यांमध्ये श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूलचा ५ - ० गोलने फरकाने जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या सामन्यामध्ये निलेश वेताळ, अनुराग शेलार, फरान शेख, शुभम रणवरे, यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून गोल नोंदवले. तसेच साईराज जराड, साईराज खरात, गोलकीपर समर्थ घाडगे यांनी उत्तम साथ देत उत्कृष्ट खेळ केला ‌.

१७ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये अंतिम सामन्यामध्ये के. एस .डी .शानभाग विद्यालय सातारा संघाचा १२-० गोलने एकतर्फी विजय संपादन केला . या सामन्यामध्ये निकिता वेताळ, सिद्धी केंजळे, वेदिका वाघमोरे , श्रुतिका घाडगे, अनघा केंजळे, श्रेया चव्हाण, अनुष्का केंजळ, यांनी उत्कृष्ट खेळ करून गोल नोंदवले. बचावफळीमध्ये मानसी पवार, तेजस्विनी कर्वे, मृण्मयी घोरपडे, गौरी हिरवळे, तसेच गोलकीपर अनुष्का चव्हाण व आरोही पाटील यांनी देखील उत्कृष्ट खेळ केला.

१७ वर्षाखालील मुलांच्या संघाने देखील उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून अंतिम सामन्यात सैनिक स्कूल सातारा संघाचा ३-० गोल फरकाने विजय नोंदवून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या सामन्यामध्ये सर्वज्ञ तरटे या खेळाडूंनी सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला उत्कृष्ट मैदानी गोल नोंदवून सामन्याची सुरुवात आक्रमक चढाईने केली. या सामन्यामध्ये साईराज काटकर , विनय भोईटे, प्रयाग आढाव, शंभूराज शिंदे तसेच गोलकिपकर मोहित मदने यांने देखील उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. 

सर्व यशस्वी खेळाडूंना सीनियर हॉकी प्रशिक्षक श्री महेश खुटाळे, हॉकी मार्गदर्शक सचिन धुमाळ, क्रीडा शिक्षक श्री खुरंगे बी.बी. यांनी मार्गदर्शन केले. तसेच फिजिकल फिटनेस मार्गदर्शक ऋषी पवार व विनय नेरकर यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ हॉकी चे जेष्ठ मार्गदर्शक जगन्नाथ धुमाळ ,निवृत्त क्रीडा अधिकारी महेश खुटाळे यांच्या हस्ते पार पडला यावेळी एबीपी माझा चे बारामती प्रतिनिधी जयदीप भगत,फलटण टुडे संपादक अमोल नाळे, आजी माजी राष्ट्रीय हॉकी खेळाडू उपस्थित होते.

या विजयाबद्दल स्पर्धेत विजेता ठरलेल्या मुले व मुलींच्या हॉकी संघाचे, खेळाडूंचे व त्यानां मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक यांचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे मा.सभापती तथा विधान परिषदेचे विद्यमान आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार मा दीपकराव चव्हाण,फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळा चे सदस्य, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समिती चेअरमन शिवाजीराव घोरपडे, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा, सहायक तपासणी अधिकारी सुधीर अहिवळे प्रशालेचे प्राचार्या वसंत शेडगे, उपप्राचार्य आण्णासाहेब ननवरे, सोमनाथ माने, पर्यवेक्षक आर बी निंबाळकर ,आर एस नाळे,पूजा पाटील,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच इतर मान्यवर आणि शिक्षकवृंद यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER