Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

पाण्याच्या श्रेय वादावरून सुरू असणारा बोरीचा बार थांबवा - महेंद्र सूर्यवंशी (बेडके)

टीम : धैर्य टाईम्स

निरा - देवघर व धोम-बलवडीच्या पाण्याच्या श्रेय वादावरून फलटण तालुक्यातील नेत्यांनी बोरीचा बार भरवलेला आहे.तो बोरीचा बार आता बंद करावा या प्रश्नांशिवाय सुध्दा इतर अनेक विविध कामे प्रलंबीत आहेत त्याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष्य देणे गरजेचे असल्याचा सल्ला  फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांनी दिला.

ते फलटण येथील वेणूताई चव्हाण हायस्कूल येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके), तालुका कॉंग्रेस कार्याध्यक्ष अमीर शेख उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे अशोकराव शिंदे

सातारा जिल्हा सरचिटणीस शंकरराव लोखंडे, फलटण शहर अध्यक्ष पंकज पवार, शहर उपाध्यक्ष मनोहर गायकवाड, खजिनदार बालमुकुंद भटटड, सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस श्री गंगाराम रणदिवे, युवक अध्यक्ष अजिंक्य कदम, शहर युवक अध्यक्ष प्रितम जगदाळे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष अल्ताफ पठाण, ओ.बी.सी शहर अध्यक्ष विकास ननावरे, अनुसुचित जाती जमाती सेलचे अध्यक्ष अभिजीत जगताप व इतर सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना महेंद्र सूर्यवंशी (बेडके ) पुढे म्हणाले, २३.७५ टी.एम.सी क्षमता असलेले पुणे जिल्हयातील भाटघर धरण व साधारण ९.८१ टी.एम.सी क्षमता असलेले सातारा जिल्हयातील वीर धरण असे एकूण ३३.५६ टि.एम.सी पाण्यापैकी फलटण तालुक्यातून जाणाऱ्या निरा उजवा कालव्यातून दररोज ५५० क्युसेक्स विसर्ग होतो, त्यापैकी मोजे रावडी कि.मी. क्र. २४/२०० ते राजुरी कि.मी. क्र. ७९/८०० एकूण ४७/६०० कि.मी एवढया अंतरात खरीप, रब्बी उन्हाळा हंगाम मिळून अंदाजे ०१ महिने विसर्ग होत असतो. त्यापैकी प्रतिदिन २३० क्युसेक्स एवढया पाण्याची गळती फक्त फलटण तालुक्यातील भागात होते म्हणजे साधारण ०९ महिन्याच्या कालावधीत ०५ ते ०६ टी.एम.सी पाणी अनेक वर्षे झाले वाया जात आहे. याकरिता प्रथम पाण्याची गळती थांबविणेसाठी अस्तरीकरण करणे गरजेचे आहे. गळती थांबविल्यास फलटण तालुक्यातील दुष्काळी भागाला मागेल त्याला लिफ्ट योजनेतून पाणी दिले जाऊ शकते. बागायती भागात अधिक पाणी पाझरल्याने नापीक जमीनीचे प्रमाण वाढू लागले आहे. ज्या निरा उजवा कालव्यामुळे फलटण तालुका बागायती क्षेत्रात मोडला जातो त्याकडे दुर्लक्ष होत असून तालुक्यातील राजकारण पाणी विषयावरुन दोघांच्या भोवतीच फिरले पाहिजे हा उद्देश ठेवून धोम-बलकवडीच्या ०.९३ टी.एम.सी पाण्यासाठी तालुका वेठीस धरला जात असल्याचा आरोप यावेळी सूर्यवंशी (बेडके ) यांनी केला.

फलटण तालुका काँग्रेसच्या वतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारकडे अस्तरीकरण करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामधील साधारणपणे ११ कि.मी. कामाची निविदा निघालेली असून उर्वरित काम निधी उपलब्ध करुन टप्या टप्याने शासनाने पूर्ण करावे अशी मागणी यावेळी सूर्यवंशी (बेडके ) यांनी केली.

ब्रिटीश कालीन निरा उजवा कालव्यावरील फलटण तालुक्यातील एकूण २० ग्रामीण रस्ते जोडणारे अरुंद पुल आहेत. त्या पुलावरील रहदारीचे प्रमाण वाढल्या कारणाने वाहतूकीसाठी अडचण ठरत आहे. तरी यातील अतिआवश्यक असलेल्या १५ पुलांच्या रुंदीकरणासाठी निधी मिळावा म्हणून फलटण तालुका काँग्रेस कमिटी पाठ पुरावा करत आहे असे फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांनी निदर्शनास आणून दिले. 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER