Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्थानक योजनेत फलटणचा समावेश

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश
टीम : धैर्य टाईम्स

रेल्वे मंत्रालयाने रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरण व नूतनीकरणासाठी अमृत भारत स्थानक योजना या शिर्षकाखाली नवीन धोरण तयार केले आहे. यामध्ये देशातील मोजकीच रेल्वे स्थानके असून फलटणचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे फलटण रेल्वे स्थानकाचा समावेश महत्वपूर्ण अमृत भारत स्थानक योजनेत करण्याचे आदेश केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विन वैष्णव यांनी दिले.

रेल्वेमंत्री ना. अश्विन वैष्णव यांच्या संसदेमधील दालनामध्ये खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व पत्रकारांशी रेल्वेच्या सुधारणा आणि फलटण - पंढरपूर नवीन रेल्वे मार्ग, लोणंद - फलटण - बारामती रेल्वे मार्ग याविषयी माहिती देताना रेल्वे मंत्री ना. अश्विन वैष्णव बोलत होते. माजी खासदार स्व. हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांचे स्वप्न असलेली फलटणची रेल्वे ही त्यांचे सुपुत्र व खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अथक परिश्रम घेत सुरु केली. त्यानंतर आता फलटण वरुन फक्त लोणंद नव्हे तर पुणे, 

फलटण- मुंबई या मार्गावर नवीन रेल्वे फेऱ्या सुरु करणार असून फलटण चे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता येथे ऐतिहासिक स्वरूपात, व छत्रपती शिवाजी महाराज यांची सासुरवाडीत ही इमारत उभी करणार आहे, याचा आराखडा स्वतः खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या सुचनेने करावा आम्ही परवानगी देऊ अशी ग्वाही ना. आश्विन वैष्णव यांनी दिली.

भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्थानक योजनेत फलटणचा समावेश खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आगामी काळामध्ये फलटण पंढरपूर व फलटण - बारामती रेल्वे सुद्धा पूर्णत्वास जाणार असून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागणीनुसार लवकरच आपण फलटण येथे वरील मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी येणार आहे, असे मंत्री आश्विन वैष्णव यांनी स्पष्ट केले.

भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्थानक योजनेत फलटणचा समावेश

स्थानक योजनेचे उद्दिष्ट रेल्वे स्थानकांचा बृहत आराखडा तयार करणे, त्याची टप्याटप्याने अंमलबजावणी करणे, किमान अत्यावश्यक सुविधा आणि अन्य सुविधांचा विस्तार, स्थानकावर रुफ प्लाझा आणि सीटी सेंटर निर्माण करणे हे असून खा. रणजितसिंह यांच्या आग्रहामुळे फलटण रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत समावेश करणार असून पुणे नंतर या योजनेत समावेश होणारे महराष्ट्रातील फलटण हे दुसरे स्थानक असेल अश्विन वैष्णव यांनी निदर्शनास आणून दिले. खा. रणजितसिंह यांनी ऐतिहासिक स्वरूपात इमारत उभारण्याच्या दृष्टीने याचा नकाशा करावा त्याला आमचा होकार असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. खा. रणजितसिंह यांनी आश्विन वैष्णव यांच्याकडे आपण फलटण ते बारामती आणि फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्याची मागणी केली असता त्यांनी अर्थसंकल्पात याबाबत तातडीने तरतूद करून फलटणकर जनतेला अनमोल भेट दिली आहे. फलटणच्या रेल्वेसाठी आश्विन वैष्णव यांचे योगदान विसरता येणार नाही, असे खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगून अमृत भारत योजनेत फलटणचा समावेश केल्याबद्दल रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले आहेत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER