Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

फलटण बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी: कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण च्या १८ जागासाठी पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १८ जगासाठी एकूण २ हजार ९४२ मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत.निवडणूक कार्यक्रमानुसार फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदान व मतमोजणी 30 एप्रिल 2023 रोजी होणार आहे.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे 

या निवडणूक कार्यक्रमानुसार सोमवार, दि. २७ मार्च ते दि. ३ एप्रिल दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज मिळतील व अर्ज दाखल करता येतील, दि. ५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत सर्व दाखल उमेदवारी अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात होईल, दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात छाननी नंतर वैध अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाईल, दि. ६ ते २० एप्रिल रोजी दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. दि. २१ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे आणि उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.मतदान व मतमोजणी ठिकाण नंतर जाहीर करण्यात येणार आहे. दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत मतदान आणि त्यानंतर मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासाने मतमोजणी होऊन मतमोजणी निकाल जाहीर करण्यात येईल.

संचालक मंडळाची निवड पध्दती पुढीलप्रमाणे 

महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व त्याखालील नियम १९६७ मधील तरतूदीनुसार बाजार समितीचा कारभार निवडून आलेले संचालक मंडळ, त्यांच्यामधील सभापती, उपसभापती, सदस्य व बाजार समितीचे सचिव अशा संचालक मंडळाकडून केला जातो. बाजार समितीच्या सध्याच्या निवडणूक पद्धतीत कार्यक्षेत्रातील सेवा संस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था सदस्यांकडून ११ व ग्रामपंचायत सदस्यांकडून ४ असे १५ शेतकरी प्रतिनिधी निवडले जातात. शिवाय व्यापारी २ व हमाल, मापाडी १ असे एकूण १८ प्रतिनिधी निवडून दिले जातात. सोसायटी मतदारसंघातील ११ जागांमध्ये सर्वसाधारण ७, महिला राखीव २, इतर मागासवर्गीय १ तर भटक्या जातीजमाती १ अशी विभागणी असते.

मतदार संघ निहाय माहिती पुढीप्रमाणे 

सोसायटी मतदारसंघ : ११ संचालक निवडून द्यावयाचे त्यापैकी सर्वसाधारण ७, महिला राखीव २, इतर मागास प्रवर्ग १, भटक्या विमुक्त जाती-जमाती १.

ग्रामपंचायत मतदारसंघ : ४ संचालक निवडून द्यायचे असून सर्वसाधारण २, अनुसूचित जाती जमाती १, आर्थिक दुर्बल १.

व्यापारी अडते मतदारसंघ : २ संचालक निवडून द्यायचे आहेत. 

हमाल मापाडी मतदार संघ : १ संचालक निवडून द्यायचा आहे. एकूण १८ संचालक निवडून द्यायचे आहेत. सोसायटी व ग्रामपंचायतीमधील शेतकरी सदस्य सदर निवडणूक लढवू शकतात.

गट निहाय मतदान पुढीप्रमाणे 

११ जागासाठी विविध कार्यकारी सोसायटी गट १ हजार ६३४ मतदान

४ जागासाठी ग्रामपंचायत गट १ हजार १८७ मतदान

२ जागासाठी व्यापारी व आडते गट ८२ मतदान

१ हमाल मापाडी गट ३९ मतदान

असे १८ जगासाठी एकूण २ हजार ९४२ मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत.

उमेदवारांसाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे 

उमेदवारी अर्ज / नामनिर्देशन पत्र सोबत उमेदवार व सुचक यांचा पासपोर्ट आकाराचा एक फोटो. (सर्व मतदार संघासाठी), उमेदवार/सुचक / अनुमोदक यांचे स्वयंसाक्षांकित आधार कार्ड झेरॉक्स प्रत, उमेदवाराचे वय वर्षे 21 पुर्ण असलेबाबत जन्मतारखेचा पूरावा, उमेदवार बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात राहत असलेबाबत गाव कामगार तलाठी यांचा रहिवाशी दाखला, उमेदवाराचे कृ.उ.बा.स. यांचे बेबाकी प्रमाणपत्र, बहुउद्देशीय विकास संस्था, ग्रामपंचायत मतदार संघातील निवडावयाच्या सर्व (एकुण 15) जागाकरिता शेतकरी असलेबाबत गावकामगार तलाठी यांचा दाखला तसेच दिनांक 01/01/2023 नंतरचा 7/12 उतारा जोडणे आवश्यक राहील. (किमान 10 गुंठे क्षेत्र आवश्यक राहील), उमेदवाराचे सक्षम प्राधिकारी यांचे स्वयंसाक्षांकित जात प्रमाणपत्र. (इ.मा.प्रवर्ग, वि.जा.भ.ज. प्रवर्ग, व अनू. जाती जमाती प्रवर्गासाठी), उमेदवाराचे सक्षम प्राधिकारी यांचे स्वयंसाक्षांकित जात वैधता प्रमाणपत्र (इ.मा.प्रवर्ग, वि.जा.भ.ज. प्रवर्ग व अनु. जाती जमाती प्रवर्गासाठी), उमेदवाराचे मा. तहसिलदार यांनी दिलेले आर्थिक दुर्बल घटक असल्याचे प्रमाणपत्र (आर्थिक दुर्बल मतदारसंघासाठी), मतदार संघाच्या अंतिम मतदार यादीमध्ये नांव असलेल्या आणि पात्र असलेल्या मतदारास, निवडणुकीसाठी त्याच मतदार संघात फक्त एका नामनिर्देशन पत्रावर सुचक किंवा अनुमोदक होता येईल/ स्वाक्षरी करता येईल,उमेदवार महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) नियम 1967, महाराष्ट्र कृषि बाजार समित्या (समितीची निवडणुक) नियम 2017 व बाजार समितीचे मंजुर उपविधीमध्ये नमुद केलेनुसार पात्रता धारण करीत असावा.

शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार देण्यावरून मतभेद

दर पाच वर्षांनी बाजार समितीमध्ये निवडणूका घेतल्या जातात. बाजार समितीचे सभापती, उपसभापती अशांची निवड याद्वारे केली जाते. पणन कायदा १९६३ मध्ये राज्यात अस्तित्वात आला तेव्हापासून संबंधित बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या ग्राम पंचायतींचे सदस्य आणि सेवा सहकारी सोसायट्यांचे सदस्य हे मतदार होते. शेतकर्‍यांना थेट मतदान करता येत नाही. तेव्हा शेतकर्‍यांना हा मतदानाचा अधिक मिळावा, यासाठी फडणवीस सरकारच्या कार्यकाळात २०१७ मध्ये पणन कायद्यात मोठा बदल केला. शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. बाजार समिती कायद्यातील सुधारणेनुसार समितीच्या बाजार क्षेत्रातील किमान दहा गुंठे जमीन ज्याच्याकडे आहे आणि पाच वर्षांत किमान तीन वेळा शेतमालाची विक्री संबंधित बाजार समितीमध्ये केली असेल अशा शेतकर्‍यांना मतदानासाठी पात्र ठरवण्यात आलं. २०१९ ला सरकार बदललं. महविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर २०२० मध्ये त्यांनी हा कायदा रद्द करून परत आधीची पद्धत आणली गेली.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्य

बाजाराच्या आवारात शेतीमाल खरेदी-विक्री व्यवसायासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवणे.

शेतकर्‍यांच्या शेतीमालाविषयी हिताचे संरक्षण करणे.

शेतीमालाची उघड लिलाव पद्धतीने विक्री करणे.

बाजाराच्या आवारात विक्रीस आलेल्या शेतीमालाचे चोख वजनमाप करणे.

शेतक-याना शेतीमाल विक्रीचे २४ तासांत पैसे मिळवून देणे.

विवादाची विनामुल्य तडजोड करणे.

शासनाने निश्चित केलेल्या शेतीमालाच्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी भावात शेती मालाची खरेदी-विक्री व्यवहार होणार नाहीत याची दक्षता घेणे.

शेतीमालाची प्रत व दर्जा वाढविण्यासाठी शेतकर्‍यांना उत्तेजित करणे.

आडतेे/व्यापारी, हमाल, तोलणार, मदतनीस, प्रक्रियाकार यांना परवाने देणे, परवान्यांचे नुतनीकरण करणे, रद्द करणे इ.

बाजार समिती कायदा व नियमातील तरतुदीनुसार परवानाधारक यांच्या हिशोबाच्या नोंदवह्या व अनुषंगिक कागदपत्रांची तपासणी करणे व हिशोब/बिलपट्ट्या प्रमाणित करणे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER