Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

फलटण तालुक्यातील प्रत्येकाला श्रीमंत करणार : खा. रणजितसिंह यांची ग्वाही

तालुक्यात एकालाच श्रीमंत लावायची हौस
टीम : धैर्य टाईम्स

तत्कालीन मंत्रिपदाच्या कारकिर्दीत रामराजे नाईक निंबाळकर यांना केवळ एका दिवसामध्ये निरा - देवघरचे पाणी आणणे शक्य होते, मात्र लाल दिव्याच्या बदल्यात 14 टी. एम. सी. पाणी बारामतीला वळवण्याचे महापाप रामराजेंनी केल्याचा गंभीर आरोप यावेळी खासदार रणजितसिंह यांनी केला 

फलटण तालुक्यात येऊ घातलेल्या निरा-देवघर प्रकल्पामुळे  मुळे  आता शेती व शेतकरी समृद्ध होणार असून प्रत्येक गावामध्ये पिके आता बहरु लागणार आहेत तर ढवळ भागाच्या शेजारून 50,000 कोटींचा रस्ता जाणार असल्याने या भागातील प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होणार आहे. तर आपल्या भागात केवळ एकाला श्रीमंत लावायची हौस होती असा टोला आमदार रामराजे यांचे नाव न घेता लगावतानाच आता आपण प्रत्येकाला श्रीमंत करणार असल्याचे अभिवचन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले, ते ढवळ (फलटण) येथील फलटण तालुका संपर्क दौऱ्या दरम्यान बोलत होते.

यावेळी जिल्हा भाजपा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, ॲड. नरसिंह निकम, सुशांत निंबाळकर, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, बबलू मोमीन, माजी नगरसेवक जाकीर मणेर, विष्णुपंत लोखंडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, अमित रणवरे, तुकाराम शिंदे, अंशुमन नाईक निंबाळकर, माऊली चव्हाण, शरद कदम, प्रकाश कदम यांच्या सह मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, निरा देवघर प्रकल्पामुळे आता फलटण तालुक्यामध्ये येणारे पाणी आठ माही होणार असू लवकरच हे येणारे पाणी बारामाही करण्याचा आपला संकल्प आहे. जिल्हा परिषद मध्ये आपल्या पत्नी सौं.जिजामाता ना. निंबाळकर निवडून आल्यानंतर रामराजेंनी या भागातील कॅनॉलची कामे बंद केली होती मात्र आपण स्वखर्चाने या भागात कॅनोलची कामे केल्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल करण्याची तयारी करीत असताना आपल्याला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करत अनेकांची पळता भुई थोडी केली होती.

पुढे बोलताना खासदार म्हणाले की, तत्कालीन मंत्रिपदाच्या कारकिर्दीत रामराजे नाईक निंबाळकर यांना केवळ एका दिवसामध्ये निरा - देवघरचे पाणी आणणे शक्य होते, मात्र लाल दिव्याच्या बदल्यात 14 टी. एम. सी. पाणी बारामतीला वळवण्याचे महापाप रामराजेंनी केल्याचा गंभीर आरोप यावेळी खासदार रणजितसिंह यांनी केला. मात्र आपण खासदार झाल्यानंतर बारामतीचे पाणी केवळ पंधरा दिवसात बंद केले होते मात्र राज्यात पुन्हा महाआघाडी सरकार आल्यानंतर ते पाणी बारामतीला वळवण्यात आले. सुदैवानेमला केंद्राच्या जलशक्ती कमिटी मध्ये समावेश केल्यानंतर हायड्रोलॉजीचा सर्वे पुन्हा करत चुकीचे निर्णय बदलून निरा - देवघरचे 14 टीएमसी पाणी आपल्या भागातून जाण्याचा मार्ग मोकळा झाला. लवकरच कालवा जोड प्रकल्पाची कामे सुरू होणार असून या भागातील शेतकऱ्यांना तो प्रकल्प पाहण्यासाठी आपण घेऊन जाणार असल्याचे वचन खासदार रणजितसिंह यांनी यावेळी दिले.

 नाईकबोमवाडी येथील एम. आय. डी. सी. 1500 एकरात असून तालुक्यातील तरुणांना मोठी रोजगार निर्मिती या ठिकाणी होणार आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्नही आता मार्गी असून ग्रामीण रुग्णालयासाठी 65 कोटी रुपयांची मंजुरी झाल्याची माहिती देतानाच फलटण येथे पुढील वर्षी सेशन कोर्ट सुरु होणार असल्याचे सातारा येथे जावे लागणार नाही असे सांगत महावितरणची संपूर्ण डीपीची कामे पूर्ण झाल्याचे यावेळी खासदार रणजितसिंह यांनी निदर्शनात आणून दिले.

माढा लोकसभेचे प्रतिनिधित्व करताना खा.शरद पवार यांनी कोणतीही विकासात्मक कामे केले नाही आणि दुष्काळात शेतकरी होरपळत असताना त्याला वाऱ्यावर सोडले त्याच शरद पवारांचा फोटो लावायला आमदार रामराजे यांना लाज वाटत असल्याचे सांगत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा आपणास सार्थ अभिमान असल्याचे खासदार निंबाळकर यांनी सांगितले.

फलटण तालुक्यातील सुरवडी स्थित कमिन्स कंपनी च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या पगारात भ्रष्टाचार होत असून रामराजें सह त्यांचे बंधू कमिशन घेत असल्याचा आरोप खा. रणजितसिंह यांनी करतानाच कमिन्स कंपनीच्या व्यवस्थापनाकाडे आपल्याला आता लक्ष घालावे लागेल असा इशारा यावेळी खासदार रणजिसिंह यांनी दिला

 मुजरा करायचा असेल तर आपल्या आई-वडिलांना करा आपल्या दैवतांना करा छत्रपती शिवाजी महाराजांना करा मात्र कोणत्याही व्यक्तीला मुजरा करू नका असे  आवाहन  खा. रणजितसिंह यांनी केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER