Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

फलटण - पंढरपूर रेल्वे मार्गासाठी निधी देणार : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची माहिती

टीम : धैर्य टाईम्स

दिल्ली येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री  अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली.  त्यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण पंढरपूर रेल्वेची सद्यस्थिती चे निवेदन देत यामध्ये फलटण - पंढरपूर रेल्वे मार्गा संबंधित संपूर्ण माहिती खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. फलटण - पंढरपूर हा रेल्वे मार्ग सुरू व्हावा यासाठी शंभर वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. इंग्रजांच्या काळामध्ये जमिनीचे अधिग्रहण झाले असून देशाच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये सुद्धा हे काम अजून पर्यंत पूर्ण होऊ शकले नाही.  तत्कालीन माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार केंद्र शासनाच्या बरोबरच पन्नास टक्के वाटा उचलायला तयार आहे अशा पद्धतीचे पत्र केंद्र सरकारकडे पाठवले होते. परंतु राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले नंतर यांनी याबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही. जमिनीचे अधिग्रहण व सर्वेक्षण पूर्ण होऊन सुद्धा पुढे कोणतीही कार्यवाही झाली नाही. आता विठ्ठलाच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यामुळे महाराष्ट्रातल्या व देशातील पांडुरंगाच्या भक्तांचे आशा पल्लवीत झाले आहेत. फलटण - पंढरपूर रेल्वे सेवा सुरू झाल्यास महाराष्ट्रातील नव्हे तर कर्नाटक गोवा, तेलंगण, आंध्र प्रदेश, या राज्यातून लाखो भक्त हे पंढरपूर मध्ये दरवर्षी येत असतात त्यांनाही याचा लाभ होणार आहे. आषाढी यात्रेच्या निमित्ताने करोडो लोक या यात्रेमध्ये सहभागी होत असतात कार्तिक, माघ, श्रावण, महिन्यामध्ये अनेक भाविक पंढरपूरला भेट देत असतात ही रेल्वे सुरू झाल्यास लाखो भक्तांना याचा फायदा होणार आहे.  त्यामुळे या भागाचा आर्थिक विकास बरोबर सर्वांगीण विकास होईल तसेच या भागातील बेरोजगार युवकांन मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे या भागाच्या विकासाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळणार आहे. मोदी सरकारने पुणे- फलटण रेल्वे सुरू करून अर्धे काम केलेले आहे. फलटण पंढरपूर रेल्वे सुरू झाल्यास संपूर्ण देशातून पंढरपूर मध्ये भाविक येण्यास याची मदत होईल. याची संपूर्ण माहिती खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दोन्ही मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तातडीने याबाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने निधी देण्याबाबत लवकरच बैठक घेण्याची सूचना करण्यात आली आहे. यामुळे हा प्रश्न लवकर मार्गी लागेल असा विश्वास खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER