Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम संपन्न

टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि. 8 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022 रोजी घरोघरी तिरंगा अभियान व स्वराज्य महोत्सव दि. 9 ते दि.17 ऑगस्ट 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध शासकीय विभाग त्या अंतर्गत असलेल्या कार्यालयांकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. महाबळेश्वर, वाई, कोरेगाव, पाटणसह जिल्ह्यातील इतर तालुक्यात विविध कार्यक्रम संपन्न झाले.

महाबळेश्वर येथे आमदार मकरंद पाटील यांचे हस्ते  ध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत महाबळेश्वर येथे ध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते महाबळेश्वर येथे करण्यात आले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कोरेगाव तालुका प्रशासनाच्यावतीने प्रभात फेरीचे आयोजन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोरेगाव नगरपंचायत व तालुकास्तरीय प्रशासनातर्फे प्रभात फेरीचे कोरेगाव शहरातून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.  

 या प्रभात फेरीमध्ये प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसिलदार अमोल कदम, पोलीस निरीक्षक नितीन सावंत, नायब तहसिलदार सुयोग बेंद्रे, मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्यासह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता

 राष्ट्रगीत म्हणून तिरंगा प्रभात फेरी सुरुवात करण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा उत्स्फूर्तपणे देत महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी व नगरपंचायत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शिस्तबध्द पध्दतीने तिरंगा रॅली काढली. या तिरंगा रॅलीमध्ये कोरेगाव शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, नागरिक, नगरसेवक सहभागी झाले होती.  रोटरी गार्डन येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन प्रभात फेरीची सांगता करण्यात आली.

मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाला विविध शाळेंच्या भेटी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, वाई कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत  आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध शाळांनी भेटी दिल्या आहेत.

विश्वकोश निर्मिती मंडळाने तयार केलेल्या 1 ते 21 संहिता खंडांमध्ये थोर क्रांतिकारक सेनानी, नेते इत्यादींवर नोंदी लिहिण्यात आल्या आहेत.  या नोदींचे वाचन करण्यात येत आहे. 4 ऑगस्ट 2022 रोजी नरसिंह विद्यालय, धोम, ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल, वाई या शाळेंनी भेटी दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांना विश्वकोश आणि कुमार विश्वकोश बाबत मार्गदर्शन कण्यात आले.

प्रधानमंत्री  सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत पाचगणी व तापोळा येथील  गरोदर मातांची तपासणी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्वानिमित्त प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र तापोळा या ठिकाणी गरोदर माता यांची तपासणी करण्यात आली. या शिबीरामध्ये 21 गरोदर मातांची तपासणी केली. यावेळी गरोदर महिलांची आरोग्य तपासणी मध्ये  पोटाची तपासणी, डॉपलर, सामान्य तपासणी, रक्त तपासणी, यूएसजी तपासणी करण्यात आली.

 तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पांचगणी येथे गरोदर माता तपासणी शिबिर संपन्न झाले या शिबीरामध्ये 76 गरोदर मातांची तपासणी करण्यात आली.  तापोळा व पाचगणी येथे आरोग्य विषयक विविध उपक्रम राबविण्यात आले.

चेवलेवाडी येथील प्राथमिक शाळेत चित्रकला स्पर्धा संपन्न

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त चेवलेवाडी ता. पाटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वत:च्या कल्पकतेने चित्र काढलेले आहेत. विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्ती, देशप्रेम, भारतीय जवानांविषयी कृतज्ञता, भारताने केलेली वैज्ञानिक प्रगती या विषयी आपल्या भवना चित्रातून रेखाटलेल्या आहेत.

शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना पाटसकर, उपशिक्षिका शैलजा गाडेकर, वैशाली जाधव यांनी मार्गदर्शन केले. प्राथमिक आरोग्य  केंद्र रेठरे बु. ता. कराड अंतर्गत बेलवडे बु.  येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व घरोघरी तिरंगा  याबाबत प्रभात फेरी काढण्यात आली.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER