Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात पिंपरद येथे सौ. सुषमा ताई मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांनी घरोघरी जात केला प्रचार अजितदादा यांच्या सारखे कणखर नेतृत्व पुन्हा घडणार नाही,शेतकऱ्याच्या मुलाला विधानसभेत पाठिंबा दिला - आमदार सचिन पाटील

दि हॉकी सातारा संघटनेच्या पाच महिला खेळाडूना ब्राँझ पदक

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनीधी– दि हॉकी सातारा संघटनेच्या पाच महिला खेळाडू कु. अनुष्का चव्हाण, कु अनुष्का केंजळे,कु.श्रेया चव्हाण कु.निकिता वेताळ व कु.तेजस्विनी कर्वे यांनी पहिल्या वेस्ट झोन महिला हॉकी स्पर्धेमध्ये ब्रांझ पदक प्राप्त केल्याची माहिती माजी तालुका क्रीडा अधिकारी सातारा हॉकी संघटनेचे सचिव महेश खुटाळे यांनी दिली.

हॉकी इंडिया अंतर्गत हॉकी महाराष्ट्र यांच्या मान्यतेने दि हॉकी सातारा संघटनेच्या व मुधोजी हायस्कूल व कनिष्ठ महविद्यालयाच्या पाच महिला खेळाडू अनुष्का केंजळे, अनुष्का चव्हाण,श्रेया चव्हाण तेजस्विनी कर्वे, व निकिता वेताळ यांची गुजरात (सुरत) येथे झालेल्या पहिल्या वेस्ट झोन महिला हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धा मध्ये महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झालेली होती. त्यांनी सुरत येथील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधीत्व केले .सातारा जिल्ह्याच्या तेजस्विनी कर्वे, श्रेया चव्हाण, निकिता वेताळ अनुष्का चव्हाण व अनुष्का केंजळे अशा पहिल्यांदाच पाच हॉकी खेळाडूंना महाराष्ट्रात हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. त्याचे सोने करत त्यांनी उत्कृष्ट खेळ करत पहिल्या वेस्ट झोन महिला हॉकी स्पर्धेमध्ये ब्राँझ पथक प्राप्त केले.

 सुरत येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या वेस्ट झोन महिला हॉकी स्पर्धेमध्ये श्रेया चव्हाण, निकिता वेताळ, अनुष्का चव्हाण अनुष्का केंजळे तेजस्विनी कर्वे यांनी उत्कृष्ट खेळ करत महाराष्ट्राच्या संघाला ब्राँझ पदक प्राप्त करून दिले.त्यांना दि हॉकी सातारा संघटनेचे सचिव तथा ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक महेश खुटाळे व हॉकी प्रशिक्षक सचिन धुमाळ प्रशिक्षण देत आहेत.तसेच प्रशिक्षणामध्ये सहाय्यक म्हणून बी बी खुरंगे सहाय्य करत आहेत.

 या पाच महिला खेळाडूंचा सत्कार विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी प्रशिक्षक व खेळाडूंनी फलटण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे होकीचे ॲस्ट्रोटर्फ मैदान उपलब्ध व्हावे अशी विनंती आ. रामराजेना केली.

 यावेळी बोलताना आ. रामराजेनी फलटण मध्ये हॉकीचा आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावा याकरिता आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकीचे ॲस्ट्रोटर्फ मैदान फलटण येथे निर्माण करणे बाबत पूर्णतः सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जेणेकरून फलटण मधील व एकूणच सातारा जिल्ह्यातील हॉकी खेळाडूंना ॲस्ट्रोटर्फ मैदानावर सराव करण्याची संधी प्राप्त होऊन येणाऱ्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होण्यास मदत होईल.

 सर्व प्रशिक्षक व खेळाडूंचे विधान परिषदेचे मा.सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार दीपकराव चव्हाण , कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मधोजी हायस्कूलचे प्राचार्य सुधीर अहीवळे व दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष बाहुबली शहा, उपाध्यक्ष सचिन लाळगे खजिनदार पंकज पवार, सदस्य प्रवीण गाडे, महेंद्र जाधव, माजी राष्ट्रीय खेळाडू शिरीष वेलणकर, सुजीत निंबाळकर यांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER