Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

महाबळेश्‍वर सुंदर हिल स्टेशन म्हणून नावारुपास येईल

जिल्हाधिकारी शेखरसिंह यांचे प्रतिपादन
टीम : धैर्य टाईम्स

महाबळेश्‍वर ः हिलदारीच्या मदतीने देशातील सर्वात स्वच्छ व सुंदर हिलस्टेशन म्हणून महाबळेश्‍वर हे पर्यटनस्थळ नावारूपास येईल, असा विश्‍वास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केला. दरम्यान, शहरातील विविध सेवाभावी संस्था संघटना व नागरिकांनी या प्रकल्पास सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. 
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हिलदारी व गिरिस्थान नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने येथील हिरडा विश्राम गृहावर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमात ते बोलत होते. उपवनसंरक्षक महादेव मोहिते, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी विनय गौड, प्रांताधिकारी संगिता राजापुरकर, तहसिलदार रणजितसिंह भोसले, पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील, पंचायत समितीचे सभापती व उपनगराध्यक्ष अफजल सुतार हे उपस्थित होते. 
महाबळेश्‍वरला निसर्गाचे वरदान लाभले आहे. परंतु, मानवनिर्मित कचर्‍यामुळे सुंदर पर्यटन स्थळाची प्रतिमा मलिन होते. ही प्रतिमा सुधारण्यासाठी पुढील तीन वर्षे हिलदारी संस्था येथे घनकचरा व्यवस्थापनाचे काम पाहणार आहे. देशातील अनेक हिलस्टेशनवर या संस्थेने काम केले आहे. पांचगणीपेक्षा महाबळेश्‍वर येथील स्वच्छतेची स्थिती अधिक खराब आहे, म्हणून येथे काम करण्याची गरज आहे. आपण कचरा व त्याची विल्हेवाट यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च करतो तरी आपल्या स्थितीत सुधारण होत नाही. आजही कचरा डेपोवर कचर्‍याचे डांगर उभे आहेत. कोकणातील वेंगुर्ले येथील कचरा डेपोवर बगिचा फुलविला आहे. अशा प्रकारे काम करण्याची गरज आहे हिलदारी या संस्थेला नागरीकांचे सहकार्य मिळाले तरच महाबळेश्‍वर हे सुंदर व स्वच्छ शहर म्हणुन उदयास येईल या साठी शहरातील विविध सेवाभावी संस्था संघटना लोकप्रतिनिधी नागरिक यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले. यापुर्वी आपण ओला आणि सुका असे दोन प्रकारचे वर्गीकरण करत होतो. आता चार प्रकारात वर्गीकरण करावे लागणार आहे. जो असे वर्गीकरण करणार नाही. अशा संस्था व कुटूंबांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतुद पालिकेने नियमावलीत करावी. केवळ आपले शहर स्वच्छ करून आपली प्रतिमा सुधारणार नाही तर महाबळेश्‍वर व पाचगणी या दोन शहराजवळ असलेली लहान लहान गावेदेखील स्वच्छ झाली पाहिजे. 
त्याचप्रमाणे पॉइंर्टकडे जाणारे रस्ते राईड्स देखील स्वच्छ हवेत. यासाठी ठोस कार्यक्रमाची आवश्यकता आहे. पालिकेने जवळच्या खेडयातील कचरा कसा गोळा करायचा त्या बाबत निर्णय घ्यावा, महाबळेश्‍वर सुंदर आणि स्वच्छ म्हणून नावारूपास येण्यासाठी पालिका महसूल व वन यांची भुमिका देखील महत्वाची ठरणार आहे. या तीनही विभागात समन्वय आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. 
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नगरीचे उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी फुलझाड देवून जिल्हाधिकारी शेखर सिह यांच्यासह इतर मान्यवरांचे स्वागत केले. हिलदारी ही संस्था पुढील तीन वर्षे कशा प्रकारे काम करणार आहे. याबाबत हिलदारीचे प्रकल्प अधिकारी डॉ. मुकेश कुलकर्णी यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. यावेळी माजी बाळासाहेब भिलारे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर हॉटेल संघटनेचे अध्यक्ष कैलेश तेजाणी, असिफ सयद तौफिक पटवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER