Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

हा तर फलटणच्या विकासाचा ट्रेलर... पिक्चर अभी बाकी हैं - खा. रणजितसिंह

टीम : धैर्य टाईम्स

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाने लोकशाही दिली मात्र फलटण मध्ये लोकशाही गाढण्याचे काम रामराजे यांनी केले. तुम्ही माझ्यामागे सामर्थ्य उभे करा आपण पुन्हा एकदा फलटणमध्ये लोकशाही नांदवू : खा.रणजितसिंह 

फलटण मध्ये येऊ घातलेले निरा - देवघर चे पाणी, पंढरपूर रेल्वेचा निधी, महावितरणची कामे, वारकरी भवन, फलटण - दहिवडी- सांगली महामार्ग,फलटणसाठी मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेला 100 कोटींचा निधी, या सह आजपर्यंत या मतदारसंघात आलेले विविध कामे हा केवळ फलटणच्या विकासाचा ट्रेलर असून पिक्चर अभी बाकी है असे सांगत फलटणला विकासाच्या सर्वोच्च शिखरावर नेहणार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले, ते तीन दिवसीय फलटण तालुका संपर्क दौऱ्यानंतर विडणी येथील आभार सभेत बोलत होते.

यावेळी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष व जेष्ठ विधीज्ञ ॲड.नरसिंह निकम , माजी पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील, विठ्ठल नाळे, सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, उपाध्यक्ष तुकाराम ढमाळ, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, अनुप शहा, सचिन अहिवळे,जाकीर मणेर, शहराध्यक्ष अमोल सस्ते, विडणीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग, निंभोरेच्या सरपंच कांचन रणवरे,बाळासाहेब ननावरे, तुकाराम शिंदे,अमित रणवरे,सचिन ननावरे,भाजपा महिला आघाडीच्या सौ. उषा राऊत,विडणी ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पुढे खासदार रणजितसिंह म्हणाले की, निरा - देवघर चे बारामती ला जाणारे पाणी आपण पुन्हा फलटणला वळवल्याने खासदार शरद पवार यांच्याशी राजकीय वैर पत्करले आहे. निरा -देवघर करीता अनेकांचे योगदान असून त्यापैकीच एक फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांचा आपण नुकताच सत्कार केल्याचे खासदार रणजितसिंह यांनी सांगितले. निरा -देवघर, फलटण- पंढरपूर रेल्वे, फलटण -दहिवडी -सांगली महामार्ग, पुणे- बेंगलोर मार्ग जो फलटण वरून जाणार आहे, फलटण शहरासाठी 100 कोटींची रस्त्यांची कामे नामदान नितीन गडकरी यांनी दिली असून हा फलटणच्या विकासाचा केवळ ट्रेलर असून फलटण येथे सेशन कोर्टाची मंजूर झाल्याने लवकर तेही सुरू होणार असल्याचे सांगत उपजिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने सुरू होणार आहे. ज्यामध्ये संपूर्ण आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध होणार असून तालुक्यासाठी आरोग्याच्या दृष्टीनेमोठे योगदान राहणार आहे. लवकरच आपण फलटणसाठी आरटीओ कार्यालय व प्रशासकीय भवनसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनात आणून दिले. केवळ लाल दिव्यासाठी 14 टी. एम. सी.पाणी बारामतीला वळवण्याचे महापाप रामराजे यांनी केले असून फलटणच्या जनतेचे गद्दार म्हणून त्यांचं नाव इतिहासात लिहिले जाणार असल्याचे खा. निंबाळकर यांनी सांगितले.

रामराजे यांनी जनतेचा विकासाच्या नावाखाली विश्वासघात केला आहे. त्यांनी केलेले पाप आता आपण जनतेच्या आशिर्वादाने धुऊन काढणार असून फलटणचा विकासाचा अनुशेष भरून काढणार असल्याचे अभिवचन खासदार रणजितसिंह यांनी दिले.

फलटणचा श्रीराम साखर कारखाना जवाहरला चालवायला दिला, सहकारी दूध संघ केवळ कागदोपत्री चालू ठेवला, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक बुलढाणा अर्बन ला चालवायला दिली, खरेदी विक्री संघही गायब केला असून गेल्या 30 वर्षात फलटण शहरही अधोगतीला नेहले असल्याचा आरोप यावेळी खासदार रणजितसिंह यांनी केला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाने लोकशाही दिली मात्र फलटण मध्ये लोकशाही गाढण्याचे काम रामराजे यांनी केले. तुम्ही माझ्यामागे सामर्थ्य उभे करा आपण पुन्हा एकदा फलटणमध्ये लोकशाही नांदवू असा विश्वास यावेळी खासदार रणजितसिंह यांनी व्यक्त केला.

फलटण तालुक्यातील साखरवाडी व विडणी या दोन्ही गावांना नगरपंचायतचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार रणजितसिंह यांनी निदर्शनास आणून दिले.

 फलटण - पंढरपूर रेल्वे मार्गावरील विडणीच्या जवळपास रेल्वे स्थानक करण्याचा आपला मानस असल्याचे सांगत याचा फायदा परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, उद्योजकांना होणार असल्याचे खासदार निंबाळकर यांनी लक्षात आणून दिले. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे ताकद उभी करा असे आवाहन यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER