Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

खैराव - मानेगाव उपसा सिंचन योजनेस राज्य शासनाची (PFR ) मंजुरी -खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माहिती

खासदार रणजितसिंह यांनी मानले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार
टीम : धैर्य टाईम्स

जलसंपदा विभाग कृष्णा - खोरे विकास महामंडळ अंतर्गत माढा तालुक्यातील खैराव - मानेगाव उपसा सिंचन योजनेस राज्य शासनाने (PFR ) मंजुरी दिली असल्याची माहिती माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

या प्रसिद्धीपत्रकात पुढे असे म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक वर्ष कायम दुर्लक्षित ठेवलेली सीना नदीवरील भीमा - सिना योजनेतून जोड कालव्याच्या मधून ७३०.४८द.ल.घ.फु इतक्या पाण्याची बचत होत असल्याने सदर पाणी प्रस्तावित खैराव - मानेगाव उपसा सिंचन योजनेसाठी वापरता येणे शक्य आहे. ही बाब खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जलसंपदा विभागाच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर शासनाने या क्षेत्राचे सर्वेक्षण करून खैराव - मानेगाव उपसा सिंचन योजनेसाठी पूर्व व्यवहार्यता अहवाल PFR तयार करून प्रस्ताव नियामक मंडळा पुढे ठेवला. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार करून बैठक घ्यावी अशी विनंती केली होती. त्यानुसार ३१ जानेवारी २०२३ रोजी माढा मतदारसंघातील प्रलंबित जलसिंचन प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली व या बैठकीत उपमुख्यमंत्री यांनी खैराव मानेगाव उपसा सिंचन योजनेच्या पूर्व्यवहारिता अहवालास PFR तत्वता मान्यता देण्यात आली असल्याचे निर्देश दिले. त्यानंतर महामंडळाकडून खैराव - मानेगाव उपसा सिंचन योजनेच्या पूर्व्यवहारिता अहवाल तयार करून शासनाची मान्यता मिळणेसाठी सदर प्रस्ताव दाखल करण्यात आला होता त्यास आज शासनाने मंजुरी दिली व नियामक मंडळाकडे कार्योत्तर मान्यता घेण्यासाठी साठी पाठवले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

या योजना मंजुरीचे पत्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कडे सुपूर्द केले. या योजनेमुळे माढा तालुक्यातील ५० वर्षापासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या १२ गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे व या भागाचा दुष्काळ कायमस्वरूपी संपणार आहे अशी भावना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे.

माढा भागातील गोरगरीब शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या व शेती पाण्याच्या प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे त्यामुळे या परिसरामध्ये शेतकऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये पुढील निवडणुक ही माढा लोकसभा मतदारसंघातील पाणी प्रश्नावर होणार नाही असा शब्द दिला होता‌ तो आज पूर्ण होताना दिसत आहे. मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या काही जलसंपदा विभागाच्या उपसा सिंचन योजना होत्या त्या सर्व मार्गी लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा दुष्काळी लोकसभा मतदारसंघ म्हणून भविष्यामध्ये ओळखला जाणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया या भागातील शेतकऱ्यांनी दिली आहे.

 या भागातील प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर छोटे मोठे व्यवसायीक तयार होतील व मतदार संघातील तरुणांच्या हाताला काम मिळेल अशी आशाही खासदार निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिमंडळातील अनेक मंत्री महोदयांचे आभार व्यक्त केले आहेत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER