Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

खा. रणजितदादांचे काम म्हणजे दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती : जयकुमार शिंदे

टीम : धैर्य टाईम्स

फलटण तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी प्राध्यान्याने कृषी, औद्योगिक विकासाला गती देत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्र व राज्य शासन आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेले काम म्हणजे जनतेला खा. रणजितदादांनी दिलेल्या शब्दांची वचनपूर्ती असल्याचे स्पष्ट मत भारतीय जनता पक्ष जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

नाईकबोमवाडी, ता. फलटण येथे मंजूर असलेल्या औद्योगिक वसाहत नामफलक उभारणी व त्याचे अनावरण छ. शिवाजी महाराज जयंती आणि खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समारंभ पूर्वक करण्यात आले. त्यावेळी जयकुमार शिंदे बोलत होते. यावेळी स्वराज पत संस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, सचिन अहिवळे, अशोकराव जाधव, राजेश शिंदे, अमोल सस्ते, लतीफ तांबोळी, रियाज इनामदार, बबलू मोमीन, राजेंद्र निंबाळकर, संजय गायकवाड, तानाजी करळे, सुरज तांदळे, रवि पवार, बापूराव चव्हाण, सरपंच दत्तात्रय चव्हाण, दयानंद घाडगे, बाबु जाधव, मंगेश चव्हाण, गणेश ढेंबरे, सोमनाथ चव्हाण, बाळासाहेब साळुंके आणि नाईकबोमवाडी व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

फलटण तालुक्याच्या कायम दुष्काळी पट्टयात कृष्णेचे पाणी पोहोचवून तेथील शेतीला ऊर्जितावस्था आणि शेतकऱ्यांना समाधान देण्यासाठी नीरा - देवघर प्रकल्पाच्या कालव्यांसह त्यावरील नियोजित उपसा सिंचन योजना पूर्ण करणे आणि नाईकबोमवाडी, ता. फलटण येथील औद्योगिक वसाहतीची उभारणी याला प्राधान्य देवून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या एक दीड वर्षात केलेले प्रयत्न यशस्वी होत असून नीरा - देवघरच्या उर्वरित कामासह संपूर्ण प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता, सदर प्रकल्प ७५ % क्षमतेवर असल्याचे स्पष्ट झाल्याने आता प्रकल्पाला केंद्र व राज्य शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध होण्यात अडचण नसल्याचे स्पष्ट झाले आहे तर नाईकबोमवाडी औद्योगिक वसाहतीला शासनाने हिरवा कंदील दाखविला असून आज नामफलक उभारण्यात आला असल्याने भविष्यात येथील कृषी औद्योगिक विकास गती घेईल असा विश्वास जयकुमार शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

कृषी औद्योगिक विकासामुळे तरुणांना नोकरी आणि उद्योग व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार असून नाईकबोमवाडी औद्योगिक वसाहती मध्ये येथील तरुणांना छोटे प्रकल्प उभारुन तालुक्याच्या औद्योगिक विकासाला गती देताना स्वतः उद्योजक बनण्याची, आपल्या कुटुंबाचा विकास साधण्याची संधी मिळणार आहे, त्याच बरोबर कृषी क्षेत्रात फळबाग व तत्सम पिके घेऊन येथे कृषी प्रक्रिया उद्योगांची उभारणी करण्याची संधी येथील शेतकरी तरुणांना लाभणार असल्याचे जयकुमार शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. प्रारंभी नामफलकाची उभारणी झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करुन श्रीफळ वाढविण्यात आले.

 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER