सातारा, दि. 27 – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या 12 पोट जातीतील 10 वी व 12 वी, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये विशेष प्राविण्य ( 60 टक्के पेक्षा जास्त) गुण मिळवू उत्तीर्ण झालेल्या गुणानुक्रमे पहिल्या 5 विद्यार्थ्यी – विद्यार्थिनींना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती देण्यात येते.
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी जोडावयाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे – साध्या कागदावर फोटो लावून अर्ज (भ्रमणध्वनी क्रमांक नमुद करावा), जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड छायांकित प्रत, गुणपत्रक, पुढील वर्गात प्रवेशाबाबतचा पुरावा.
विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 22, अ, जुनी एम.आय.डी.सी. रोड, बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाणपुलाजवळ सातारा येथे दि. 20 जुलै 2023 रोजीपर्यंत सादर करावेत, असे जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांनी केले आहे.



















