कापशी ( मोटेवाडी ) ता. फलटण येथील सदाशिव खंडेराव यादव यांचे आज दिनांक 19 ऑक्टोबर 2020 रोजी पहाटे अल्पशा आजाराने फलटण येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले.
कापशी गावातील पहिले जुनी मॅट्रिक परीक्षा 1966 साली उत्तीर्ण होऊन मेकॅनिक व्यवसायात त्यांनी फलटण येथे व नंतर किर्लोस्कर न्युमटिक पुणे येथे काम केले.
स्वतः शिकून आपल्या सर्व कुटुंबीयांना त्यांनी शिक्षित केले.डॉ.बी के यादव यांचे ते वडील बंधू आणि डॉ.चंद्रशेखर यादव यांचे ते चुलते होत. त्यांच्या पश्चात २ विवाहित मुले,विवाहित मुलगी,पत्नी,नातवंडे असा मोठा परिवार आहे. सावडने विधी शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता मोटेवाडी (कापशी ) ता. फलटण येथे होणार आहे.



















