Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

आ. शिवेंद्रसिंहराजे जो निर्णय घेतील तोच आमचा निर्णय

सातारा तालुक्याचा एकमुखी निर्धार; जिल्हा बँकेसाठी जोरदार शक्तीप्रदर्शन
टीम : धैर्य टाईम्स
Our decision is the decision that Shivendrasinhraje will take
सातारा जिल्हा बँकेवर नेहमीच सातारा तालुक्याचे वर्चस्व राहिले असून जिल्हा बँकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले जो निर्णय घेतील त्याला पूर्णपणे पाठिंबा देण्याचा निर्णय जिल्हा बँकेच्या सातारा तालुक्यातील मतदारांनी एकमुखी जाहीर केला.

सातारा : सातारा जिल्हा बँकेवर नेहमीच सातारा तालुक्याचे वर्चस्व राहिले असून जिल्हा बँकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले जो निर्णय घेतील त्याला पूर्णपणे पाठिंबा देण्याचा निर्णय जिल्हा बँकेच्या सातारा तालुक्यातील मतदारांनी एकमुखी जाहीर केला. दरम्यान, सातारा तालुक्यात सर्वाधिक मतदार संख्या असल्याने किमान एक जागा वाढवून देण्याची मागणीही मतदारांनी केली. यावेळी सातारा तालुक्यातील मतदारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. 

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा तालुक्यातील जिल्हा बँकेचे मतदार आणि पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मेळावा घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथे झालेल्या मेळाव्याला बँकेच्या विकाससेवा सोसायटी, खरेदी विक्री संघ, कृषी उत्पादन प्रक्रिया, नागरी बँका/ नागरी पतसंस्था, गृहनिर्माण व दूध उत्पादक संस्था, औद्योगिक विणकर व मजूर ग्राहक संस्था/ पाणीपुरवठा संस्था मतदारसंघातील सर्व मतदार उपस्थित होते. 
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सभापती सतीश चव्हाण, किरण साबळे पाटील, वनिता गोरे, माजी सदस्य राजू भोसले, विद्यमान सदस्य प्रतीक कदम, जेष्ठ नेते लालासाहेब पवार, बापू साळुंखे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष रविंद्र कदम, विद्यमान संचालक अनिल देसाई, प्रकाश बडेकर, कांचन साळुंखे, पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर, उपसभापती अरविंद जाधव, सातारा पालिकेचे विरोधी पक्षनेते अशोक मोने, अमोल मोहिते, कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालिकेचे आजी- माजी सभापती, उपसभापती, सदस्य, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी लालासाहेब पवार, सतीश चव्हाण, राजू भोसले आदींनी मनोगत व्यक्त केले. गेल्या पाच वर्षात बँकेचे चेअरमन म्हणून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उठावदार आणि चांगले काम केले आहे. एकूण मतदानापैकी सुमारे ४५० मतदान एकट्या सातारा तालुक्याचे आहे. त्यामुळे सातारा तालुक्याला संचालक पदाची किमान एक जागा वाढवून द्यावी, तसेच उमेदवार ठरवण्याचे अधिकार सर्वस्वी आ. शिवेंद्रसिंहराजे यांना द्यावेत, अशी एकमुखी मागणी मेळाव्यात सर्व मतदार आणि उपस्थितांनी केली. बँकेच्या निवडणुकीसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे जो निर्णय घेतील त्याला पूर्ण पाठिंबा राहील, असा ठराव मेळाव्यात उपस्थित सर्वांनी केला. दरम्यान, जिल्हा बँकेचा कारभार राजकारणविरहित आहे. निवडणूकही अपेक्षेप्रमाणे पक्ष विरहित होईल. त्यामुळे तालुक्यातील मतदारांच्या मागण्या आणि भावना संबंधितांकडे पोहचवू आणि सकारात्मक निर्णय घेऊ, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER