फलटण प्रतिनिधी:-
पहिला मानाचा व नवसाला पावणाऱ्या शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी मा.नगरसेवक फिरोज आतार यांची बिनविरोध व फेर निवड करण्यात आली. रामेश्वर गणपती मंदिरात झालेल्या मंडळाच्या सभेत ही घोषणा करण्यात आली.
यावेळी मंडळाच्या विविध पदाच्या निवडीबाबत कार्यकर्त्याची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मागिल वर्षाच्या ताळेबंद मागील वर्षाचे खजिनदार बाळासाहेब भट्टड यांनी सादर केला. यानंतर यावर्षीच्या मंडळाच्या विविध पदासाठी निवडीची सूचना निलेश खानविलकर यांनी मांडली ,याचे अनुमोदन श्रीनाथ नलवडे व निलेश चिंचकर यांनी दिले. या बैठकीचे अध्यक्ष प्रीतम बेंद्रे यांनी सूचनेस मान्यता दिली.
यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी व खजिनदार पदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांना नावे देण्याची सूचना बैठकीचे अध्यक्ष प्रीतम बेंद्रे यांनी केली.
उपाध्यक्ष पदासाठी राजेंद्र कर्वे, सुमित मठपती, साजिद डांगे, तीन सेक्रेटरी पदासाठी सौरभ सुतार, प्रमोद देशपांडे, प्रणव डहाळे व दोन खजिनदार पदासाठी बाळासाहेब भट्टड व श्रीनाथ नलवडे यांची बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली.
फलटण शहरातील सर्वात जुन्या व मानाच्या समजल्या जाणाऱ्या व फलटण मधील सर्वात मोठी गणेश विसर्जन मिरवणूक काढणाऱ्या शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष पदी पुन्हा एकदा फिरोज आतर यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.
यावेळी शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.



















