फलटण प्रतिनिधी -
विक्रम गॅस एजन्सी फलटण म्हणजे मालकाचा रुबाब, अन् कामगारांचा मस्तवाल पणा अशा दुहेरी संकटात सापडलेल्या या एजन्सी चा परवाना आता रद्दच करावा अशी मागणी भारत गॅस ग्राहकांनी पुरवठा ग्राहकांनी पुरवठा शाखेला केली आहे.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या गॅस सिलेंडर बाबत थोडा पुरवठा मागे पुढे होत होता मात्र त्यावरती केंद्र व राज्य सरकारने तो पुरवठा सुरळीत केला असताना सुद्धा फलटण येथील विक्रम गॅस एजन्सी कार्यालयाजवळ ग्राहकांची गर्दी होत असून त्या ग्राहकांना मुद्दामहून हुसकावून किंवा विशिष्ट जातीच्या लोकांना बदनामी कारक शब्द वापरून त्यांची अवहेलना केली जात आहे.
दरम्यान या बाबत नुकत्याच स्थानिक व जिल्हा दैनिकांनी या बाबतीत वृत्त प्रसिद्ध करून विक्रम गॅस एजन्सी ची पोलखोल केली होती,तसेच या पूर्वीच्या गॅस सिलेंडर ची काळी कमाई अन् अधिकारी व कर्मचारी यांचा आर्थिक जुगाड बाहेर पडला होता. त्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी 25 मार्च 26 रोजी क्रपूशा/रॉकेल कावी/50/2026 रोजीच्या पत्रानुसार रोहित रवींद्र निकम व करण विठ्ठल निकम या नावे अधिकारी वैशाली राजमाने जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा यांनी पत्र दिले असून त्यामध्ये त्यांनी संबंधित मालकाला खुलासा केला जावा असे सांगितले आहे अन् खुलासा न केल्यास दंड का करू नये अशी लेखी विचारणा केली आहे. तरीही विक्रम गॅस एजन्सी च्या कारभाराबाबत अद्यापही कसलीही सुधारणा होत नसल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान या विक्रम गॅस एजन्सी चा भोंगळ कारभाराचा आता थेट पंचनामा केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.











