Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

'अजिंक्यतारा' शेतकर्‍यांना किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द

आ. शिवेंद्रसिंहराजे; कारखान्याच्या ३८ व्या गळीत हंगामाचा उत्साहात शुभारंभ
टीम : धैर्य टाईम्स
Ajinkyatara is committed to provide affordable rates to farmers
आज आपल्या संस्थेचा नावलौकीक आहे. कारखाना उपपदार्थ निर्मीतीसाठी प्राधान्य देत असून त्यातून संस्थेचे उत्पन्न वाढत आहे. चालू गळीत हंगामातही अजिंक्यतारा कारखाना शेतकर्‍यांना किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द राहील, असा शब्द कारखान्याचे मार्गदर्शक संचालक श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.

सातारा : स्व. भाऊसाहेब महाराजांनी तालुक्यातील जनतेच्या साक्षीने आणि सहकार्याने लावलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखानारूपी रोपट्याचे आज भल्या मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे. आज जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आर्थिकदृष्ट्‌या एक भक्कम आणि सक्षम सहकारी संस्था म्हणून कारखान्याला ओळखले जात आहे. सभासद शेतकरी आणि कामगार वर्गाचे सहकार्य, संचालक मंडळाचे काटकसरीचे धोरण यामुळेच आज आपल्या संस्थेचा नावलौकीक आहे. कारखाना उपपदार्थ निर्मीतीसाठी प्राधान्य देत असून त्यातून संस्थेचे उत्पन्न वाढत आहे. चालू गळीत हंगामातही अजिंक्यतारा कारखाना शेतकर्‍यांना किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द राहील, असा शब्द कारखान्याचे मार्गदर्शक संचालक श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या ३८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याच्या जेष्ठ सभासदांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून उत्साहात पार पडला. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्‍वास शेडगे, सर्व संचालक आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
कारखाना गाळपास येणाऱ्या उसाला एफआरपीनुसार वेळेत पेमेंट अदा करत आहे. इतर कारखान्यांची परिस्थिती पाहता आपल्याच कारखान्याला ऊस घालण्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल आहे आणि ही बाब आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची आहे. यंदाच्या गळीत हंगामात ७ लाख ५० हजार मे. टन. एवढ्या विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट असून हा विक्रम आपला कारखाना निश्चितच करणार आहे. गाळपासाठी सगळी यंत्रणा सक्षम झाली असून हाही हंगाम यशस्वीपणे पार पडेल यात कोणतीही शंका नाही.
कारखान्याने गाळप क्षमता वाढवण्याबरोबरच टप्प्याटप्प्याने डिस्टिलरी, इथेनॉल प्रकल्पांचेही विस्तारीकरण करण्याचे काम सुरु केले आहे. इतर कारखान्यांच्या तुलनेत आपल्या कारखान्याच्या साखरेचा दर्जा चांगला असून कारखाना दरही उच्चतम देत आहे. या हंगामात ऊसदर देताना जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या निर्णयाप्रमाणेच आपला कारखाना किफायतशीर देणार आहे. उच्चतम दर देण्याची परंपरा यंदाही कायम राहील. हंगाम यशस्वी करण्यासाठी नोंद केलेला संपूर्ण ऊस आपल्या कारखान्याला घालावा आणि नेहमीप्रमाणे हंगाम यशस्वी करण्यासाठी सभासद, शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.
व्हा. चेअरमन शेडगे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. संचालक नामदेव सावंत यांनी आभार मानले. कार्यक्रमास कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, जिल्हा परिषद सदस्य प्रतीक कदम, माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, सतीश चव्हाण, किरण साबळे- पाटील, पंचायत समिती सभापती सरिता इंदलकर, उपसभापती अरविंद जाधव, सदस्य जितेंद्र सावंत, दयानंद उघडे, आनंदराव कणसे, छाया कुंभार, धर्मराज घोरपडे, मिलिंद कदम, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बडेकर, कांचन साळुंखे, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शिवाजी सावंत, उपाध्यक्ष नारायण साळुंखे, दिलीप फडतरे, सुनिल काटे, गणपतराव शिंदे, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, ऍड. सुर्यकांत धनावडे, उत्तमराव नावडकर, जालिंदर महाडिक, पंडितराव सावंत, गणपत मोहिते, प्रतापगड साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दादा पाटील, अरविंद चव्हाण, अजित साळुंखे, जेष्ठ संचालक लालासाहेब पवार, कामगार युनियचे अध्यक्ष कृष्णा धनवे, सरचिटणीस सयाजी कदम यांच्यासह अजिंक्य उद्योग समुहाचे सर्व आजी माजी संचालक, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, बिगर सभासद आणि कामगार, कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER