Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात पिंपरद येथे सौ. सुषमा ताई मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांनी घरोघरी जात केला प्रचार अजितदादा यांच्या सारखे कणखर नेतृत्व पुन्हा घडणार नाही,शेतकऱ्याच्या मुलाला विधानसभेत पाठिंबा दिला - आमदार सचिन पाटील अजित दादांच्या अचानक जाण्याने खूप मोठा धक्का,त्यांचे खूप उपकार सातारा जिल्ह्यावर होते - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी वाहिली श्रद्धांजली कोळकी येथील दांपत्य अपघातात ठार कर्तव्य बजावत असताना तरडगावच्या सुपुत्रचा दुर्दैवी मृत्यू अजित पवार हे जनतेचे नेते होते : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वर केली पोस्ट - उद्या अंत्यसंस्कार तरडगाव येथे राजेगटाला रामराम करीत शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल : ॲड. सौ.जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला विकासाचा शब्द जयकुमार या नावाचा संस्कृतमध्ये अर्थ तरुण विजयी किंवा विजयाचा तरुण वडजल करांचा भाजपमध्ये प्रवेश, विष्णुपंत लोखंडे व धनंजय साळुंखे पाटील यांना एकमुखी पाठिंबा देत आम्ही विकास पुरुष पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे केले स्पष्ट विडणी प्रमाणे धुळदेव,पिंपरद,माझेरी गावाचा विकास होईल, - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग कोळकी गावचे उद्योजक तथा माजी ग्रामपंचायत सदस्य उमेशशेठ काशिद यांचा राजेगटाला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश राजेगटाला जबर धक्का, दडस वस्ती कुरवली येथील शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल, जयकुमार शिंदे अन् युवराज सस्ते चेअरमन यांची प्रचारात आघाडी हाकेच्या अंतरावर एमआयडिसी होणार असून रोजगाराचा अन पाण्याचा प्रश्न माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सुटला आहे - आमदार सचिन पाटील विरोधकांना त्यांची जागा दाखवा : आमदार सचिन पाटील : मुंजवडी येथील कोपरा सभा आम्ही शरद पवारांच्या छताडावर बसून रेल्वे नेली अन तुम्ही फक्त त्यांची चाटायचं काम केले - श्रीमंत रामराजेंवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची बोचरी टीका स्व. माजी आमदार चिमणराव कदम यांनी बांधलेले उपजिल्हा रुग्णालय सुरु होऊ दिले नाही अन त्यांचा पुत्र त्यांच्या वळचनीला गेलाय - झिरपवाडी येथे आमदार सचिन पाटील यांचे टिकास्त्र विडणी गणात सचिन अभंग अध्यक्ष यांची प्रचारात मोठी आघाडी, धुळदेव मध्ये तरुण वर्गाने केला विजयाचा निश्चय शिंदेमाळ गावानेच केला भाजपात प्रवेश, स्मिता गायकवाड यांचा विजय सोपा राजे गटाला कोळकीत जोरदार धक्का; युवा नेते अनुप गायकवाड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश जयकुमार शिंदे व युवराज सस्ते चेअरमन यांची प्रचारात आघाडी, गावागावातून होत आहे मोठ्या जल्लोषात स्वागत विडणी गणातील भाजप उमेदवार सचिन अभंग प्रचाराचा आज शुभारंभ फलटण हादरले! पहिल्या प्रियकर व नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराचा निर्घृण खून प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड, स्वीकृतपदी सुदाम आप्पा मांढरे, अशोकराव जाधव फलटणच्या उपनगराध्यक्षपदी प्रियदर्शनी रणजीतसिंह भोसले यांची वर्णी लागण्याची चर्चा विष्णू लोखंडे यांनी वाठार निंबाळकर गटातून भरला जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज निष्ठावंत शिवासैनीकांना जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीला उमेदवारीच नाही, शिवसैनिक पालकमंत्री यांची तक्रार ना. एकनाथ शिंदे यांना करणार?

गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी -


शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, (शिविम) कोल्हापूर व रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय आयोजित राष्ट्रीय चर्चासत्र व शिविमचे १५ वे अधिवेशन नुकतेच सातारा येथे संपन्न झाले. या अधिवेशनात मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. अशोक शिंदे यांना त्यांच्या ‘गाव पांढरीच्या वैभवखुणा’ या ग्रंथासाठीचा शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचा ‘ललितेत्तर साहित्य पुरस्कार’ कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मराठी अधिविभाग प्रमुख व जेष्ठ मराठी समीक्षक प्रो. डॉ. रणधीर शिंदे, शिविमचे अध्यक्ष डॉ. भरत जाधव, शिविमच्या १५ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष व प्रसिद्ध साहित्यिक प्रो. डॉ. रफिक सूरज, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे व इतर मान्यवर उपस्थित होते. 


निवृत्त प्राचार्य डॉ . प्रकाश कुंभार यांच्या ५० हजार रुपयांच्या देणगीच्या व्याजातून दिला जाणारा हा पुरस्कार यावर्षी प्रा. डॉ. अशोक शिंदे, मुधोजी महाविद्यालय, फलटण यांच्या ‘गाव पांढरीच्या वैभवखुणा’ या ग्रंथास जाहीर करण्यात आला होता. दरवर्षी होणाऱ्या शिविमच्या अधिवेशनात या पुरस्काराचे वितरण करण्यात येते. यावर्षी शिविमचे १५ वे अधिवेशन सावित्रीबाई फुले महाविद्यालय सातारा येथे आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. लेखक अशोक शिंदे यांचा हा ग्रंथ सातारा येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रकाशन मंडपात प्रकाशित झाला होता. या ग्रंथास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ मराठी साहित्यिक तथा समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना तर साहित्यिक व प्रसिद्ध व्याख्याते डॉ. यशवंत पाटणे यांची पाठराखण लाभली आहे. ग्रामिण व कृषिजीवनातील नामशेष होत चाललेल्या साधनांचे महत्त्व, उपयोगिता आणि त्यांचे सांस्कृतिक व सामाजिक स्थान ललित रम्य भाषेतून लेखक शिंदे यांनी या ग्रंथात मांडले आहे. एकूण अठरा ललित लेख असलेल्या या ग्रंथात भारतीय कृषी ग्रामीण संस्कृतीतील प्रमुख साधनांचे प्राचीन ते आधुनिक काळातील वैभव शब्दबद्ध केलेले आहे. ही साधने म्हणजे केवळ वापरायच्या वस्तू नसून ही साधने म्हणजे आपल्या संस्कृतीचा अमूल्य व जिवंत वारसा आहेत. काळाच्या ओघात आधुनिक माहिती तंत्रज्ञान तथा डिजिटल क्रांतीच्या युगात वापरात नसलेल्या व विस्मृतीत जाऊ पाहणाऱ्या या ग्रामीण संस्कृतीचे सजीव दर्शन घडविणाऱ्या या ग्रंथात आपल्या या समृद्ध जीवन वारशाच्या वैभवखुणा चित्रित झाल्या आहेत. त्यामुळे हा ग्रंथ सद्या वाचक व समीक्षक यांच्या पसंतीला उतरत आहे.


 प्रा. शिंदे यांस प्राप्त झालेल्या या पुरस्काराबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम आणि विविध क्षेत्रातील मान्यवर याशिवाय शिविम परिवार व महाविद्यालयातील शिक्षक यांनी लेखक शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER