फलटण नगर परिषदेचे मा.नगरसेवक, पत्रकार अजय माळवे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाणे साजरा होणार आहे. 29 जानेवारी ला भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना काळात अजय माळवे यांनी उत्कृष्ट काम केले होते. सामाजिक कामासाठी सातत्याने अग्रेसर असणारे अजय माळवे सुपरिचित आहेत.
फलटण नगरपरिषदेचे कार्यक्षम, तरुण तङफदार नगरसेवक आणि धङाङीचे पञकार अजय माळवे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक २९ जानेवारी रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गजराज तरुण मंङळाचे अध्यक्ष तात्या तेली यांनी दिली.

अजय माळवे यांच्या वाढदिवसानिमित्त अजय माळवे मिञमंङळ, गजराज तरुण मंङळ, मराठी पञकार परिषदेच्या संयुक्त विद्दमाने आणि फलटण ब्लङ बॕंक, एन. व्ही. देसाई आय हॉस्पिटल हडपसर पुणे यांच्या सहकार्याने रविवार दिनांक २९ जानेवारी रोजी तेली गल्ली बुधवार पेठ येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर, नेञतपासणी, मोफत मोतीबिंदू, शस्त्रक्रिया शिबीर, मोफत चष्मे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच वृक्षारोपन, महात्मा शिक्षण संस्थेच्या मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न, वृद्धाश्रमात फळे वाटप करण्यात येणार असून अजय माळवे हे आपल्या तेली गल्ली बुधवार पेठ येथील निवासस्थानी शुभेच्छा स्विकारणार आहेत. अशी माहिती तात्या तेली यांनी दिली.



















