फलटण : प्रतिनिधी
धैर्य टाईम्स या वृत्तपत्राच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक २८ मे २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कराओके गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा फलटण - गिरवी रोड, साई मंदिर हॉल, साई मंदिर, जाधववाडी ता. फलटण या ठिकाणी संपन्न होणार आहेत.
विजेत्या स्पर्धाकांना पुढील प्रमाणे बक्षिसे दिली जाणार आहेत. पहिला क्रमांक रुपये ५०००/- पाच हजार रोख ट्रॉफी व प्रमाणपत्र,दुसरा क्रमांक रुपये ३०००/- तीन हजार रोख ट्रॉफी व प्रमाणपत्र, तिसरा क्रमांक रुपये २०००/- दोन हजार रोख ट्रॉफी व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ रुपये १०००/- एक हजार रोख ट्रॉफी व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ रुपये १०००/- एक हजार रोख ट्रॉफी व प्रमाणपत्र, अशा पाच विजेत्या स्पर्धाकांना बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रवेश संख्या मर्यादित असून प्रवेश फी रुपये २००/- दोनशे असणार आहे. स्पर्धेनंतर त्याच दिवशी त्याच ठिकाणी सायंकाळी 5 वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण केले जाणार आहे.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रशांत सुतार असणार आहेत. प्रशांत सुतार यांना भारत सरकारच्या केंद्रीय शाळेत संगीत शिकवण्याचा 30 वर्षांहून अधिक अनुभव आहे. तर गायक, संगीतकार, संगीत संयोजक म्हणून ते सुपरिचित आहेत. त्याचबरोबर सह परीक्षक म्हणून फलटण येथील ख्यातनाम गायक किशोर खुडे काम पाहणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. गणेश नांदले करणार आहेत. अधिक माहितीसाठी +91 98220 20155 / +91 73854 79777 या क्रमांकावर संपर्क साधावा.



















