Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

ग्रामीण पत्रकारांनी पत्रकारिता करतानाच स्वतःचा व्यवसाय सुरु करुन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची गरज : विलास बडे

लोणी काळभोर येथील पत्रकार स्नेहमेळाव्यात 'न्यूज 18 लोकमत' वृत्तवाहिनीचे वरिष्ठ पत्रकार विलास बडे यांचे मत
टीम : धैर्य टाईम्स

लोणी काळभोर (पुणे) : पत्रकारिता क्षेत्रात शहरी पत्रकारांचा बोलबाला असला तरी, पत्रकारिता जिवंत ठेवण्याचे काम सध्या फक्त ग्रामीण पत्रकार करत आहेत. ग्रामीण भागातील पत्रकारांनी माध्यमांच्या बदलत्या स्वरूपानुसार पत्रकारिता बदलणे गरजेचे आहे. बदलल्याशिवाय ग्रामीण भागातील पत्रकार सध्याच्या स्पर्धेच्या युगात तग धरू शकणार नाहीत, असे मत 'न्यूज 18 लोकमत' वृत्तवाहिनीचे वरिष्ठ पत्रकार विलास बडे यांनी व्यक्त केले. 

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी विद्यापीठातील राज कपूर सभागृहात प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकारांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा व स्नेह मेळाव्याचे शनिवारी (ता. 22) आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन लोकमतचे संपादक संजय आवटे यांच्या हस्ते करण्यात आले. तर स्नेहमेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्नेहमेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना विलास बडे यांनी मत व्यक्त केले. 

यावेळी आमदार अशोक पवार, राहुल कुल, विधीज्ञ असीम सरोदे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक प्रदीप कंद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, उपसभापती रवींद्र कंद, संचालक प्रशांत काळभोर, सुदर्शन चौधरी, शशिकांत गायकवाड, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती युगंधर काळभोर, कदमवाकवस्तीचे सरपंच चित्तरंजन गायकवाड, यांच्यासह प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील जगताप, कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे, उपाध्यक्ष राजेंद्र बाप्पू काळभोर, सचिव संदीप बोडके, खजिनदार विजय काळभोर, सल्लागार तुळशीराम घुसाळकर, प्रभाकर क्षीरसागर, सातारा जिल्हाध्यक्ष सचिन मोरे, पुणे जिल्हा समन्वयक तुकाराम गोडसे, हवेली तालुका कार्याध्यक्ष सचिन सुंबे यांच्यासह पुणे व सातारा जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

यावेळी बोलताना विलास बडे म्हणाले, खऱ्या अर्थाने पत्रकारिता जिवंत ठेवण्याचे काम सध्या फक्त ग्रामीण पत्रकार करत आहेत. ग्रामीण भागातील पत्रकारांनी स्वतःचा व्यवसाय सुरु करुन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे. 

 

जागतिकीकरणानंतरच्या नव्या जगात माध्यमांची क्रांती : संजय आवटे

'जागतिक स्तरावरील बातमी माध्यमांमुळे तातडीने समजते. ग्रामीण भागातील स्थानिक जनतेच्या वेदना, विवंचना, समस्या समोर येणे ही गरज आहे. स्वत:चे माध्यम उभे करून स्थानिक विषयांमध्ये प्रभावी भूमिका घेण्याची गरज आहे. पूर्वी वर्तमानपत्रात बातमी आल्यानंतरच घटना जगाच्या कानाकोपऱ्यात पसरायची. आता घटना घडताना लगेच समजते. जागतिकीकरणानंतरच्या नव्या जगात माध्यमांची क्रांती झाली. सर्व माध्यमे मोबाईलमुळे हातात आली. कोरोनाच्या काळात डिजिटल माध्यमांना अधिक महत्त्व प्राप्त झाले. ही सगळी माध्यमे एकमेकांचा हात हातात घेऊन चालली आहेत. वृत्तवाहिन्या कोणत्या वर्तमानपत्रात काय आहे हे सांगताना दिसतात. जग, देश स्तरावरील माहिती प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे समजते. पण ग्रामीण भागातील स्थानिक जनतेच्या वेदना, विवंचना, समस्या, समोर येणे ही गरज आहे. त्यातून हायपर लोकल ही संकल्पना उदयाला येत आहे. प्रशिक्षणानंतर स्वत:चे माध्यम उभे करून स्थानिक विषयांमध्ये प्रभावी भूमिका घेण्याची संधी आहे,' असे संजय आवटे म्हणाले.

 

पत्रकार हेच लोकशाहीचे खरे रक्षक : असीम सरोदे 

पत्रकारिता आणि न्यायिक बंधने या विषयावर आपले मत व्यक्त करताना ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी सांगितले की, 'लोकशाहीचे खरे रक्षक पत्रकार हेच असून भावनिक होऊन पत्रकारिता करण्यापेक्षा कायद्याच्या आधार घेऊन पत्रकारिता करावी. अन्यायग्रस्त पत्रकारिता न करता हिंमत वापरून अन्याय झालेल्या लोकांना मदत करणारी पत्रकारिता असावी.' 

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी राज्यातील सर्वसामान्य रुग्णांना मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून झालेल्या मदतीचा आढावा घेत पत्रकारांच्या आरोग्याचे प्रश्न मांडले. सहायता कक्षाच्या माध्यमातून योग्य ती मदत देण्याचे आश्वासन सर्व पत्रकारांना दिले. 

आरोग्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना प्रिंट व डिजीटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने "आरोग्यदूत पुरस्कार" देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार मंगेश चिवटे यांना प्रिंट व डिजीटल मिडीया पत्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष व 'पुणे प्राईम न्यूज'चे मुख्य संपादक जनार्दन दांडगे यांच्या हस्ते देण्यात आला. तर जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केल्याबद्दल पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांना संघटनेच्या वतीने "असामान्य कर्तृत्व" पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिवाजी ननवरे यांना हा पुरस्कार "न्यूज 18 लोकमत" वृत्तवाहिनीचे वरिष्ठ पत्रकार विलास बडे यांच्या हस्ते देण्यात आला.

 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER