फलटण प्रतिनिधी -
नाथपंथी समाजाच्या इतिहासात 29 मार्च 2026 हा दिवस अत्यंत ऐतिहासिक ठरला आहे. समाजातील असंघटित कामगार व बांधवांना एकत्रित करून त्यांना त्यांच्या न्यायहक्कांसाठी सक्षम व्यासपीठ मिळावे,या उद्देशाने नाथपंथी समाज संघर्ष संघटना स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून निःपक्षपातीपणे व लोकशाही पध्दतीने सर्वांच्या साक्षीने व बहुमताने अध्यक्षपदी महादेव सावळा शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच कार्याध्यक्ष पदी नंदूकुमार नामदेव शेगर,संभाजी निवृत्ती इंगोले, सुभाष धोंडीराम भोसले, सुरेश तुकाराम साळुंखे उपाध्यक्षपदी अनिल दगडू शिंदे, अर्जुन संभाजी शिंदे, आदिनाथ बाबुराव इंगोले, भगवान राजाराम शिंदे तर महासचिव पदी सर्जेराव विठोबा जाधव संघटनेच्या सचिव पदी सुनिल भगवान शेगर, संजय सिद्धू इंगोले, अक्षय सुदाम सावंत व खजिनदार वैभव नंदुकुमार शेगर, प्रवक्ता म्हणून भैरू शंकर भोसले, श्रीधर मारुती शिंदे अमोल दत्तात्रय पवार,प्रसिद्धी प्रमुख पदी, रविंद्र सर्जेराव जाधव, अक्षय शिवाजी शिंदे, संघटक म्हणून नवनाथ जगन्नाथ जगताप, बाबाजी सुदाम शिंदे, रामा धोंडीराम चव्हाण, संघटनेत सदस्य हरिशचंद्र रामचंद्र जाधव, भैरवनाथ भीमराव आहेर , या सर्वच मान्यवरांची निवड देखील निःपक्षपातीपणे व लोकशाही पध्दतीने झालेली आहे. ही कोअर कमिटी राज्यभरातील नाथपंथी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, हक्क व अधिकारांसाठी तसेच शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे.
दरम्यान या निवडी नुकत्याच पुणे येथील साने गुरुजी सभागृहात झाल्या यावेळी राज्यभरातून मोठ्या संख्येने मान्यवर, कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित राहिले होते. कामगार आयुक्तालयामार्फत संघटनेची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीत लोकशाही पद्धतीने अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पार पडली. सर्वानुमते पुढीलप्रमाणे कोअर कमिटी जाहीर करण्यात आल्या असून सर्वांचे सर्व समाजातून अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.










