Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

माझ्या आठवणीतील निवडणूक : जाणिवा,संवेदना आणि जबाबदारी - श्रीमती अहिल्या भोजने

टीम : धैर्य टाईम्स

** 

नेहमीप्रमाणेच मला उद्या विधानसभा निवडणूकीसाठी(Election सुट्या२०२४) जायचं होतं. गेल्या वेळीच्या लोकसभा निवडणूकीप्रमाणे सचिन ढोले साहेब निवडणूक निर्णय अधिकारी असल्याने महिलांना त्याच्या सोयीने बूथ व घरी जाण्याची सोय असणार हे निश्चित होत. पण तरी देखील १० - २० हजार कर्मचाऱ्यां मध्ये १० - २० लोकांची गैरसोय होणं क्रमप्राप्त असतं पण कदाचित त्या दहावीस मध्ये मी असेल तर म्हणून मी राहण्याच्या दृष्टीने बॅग भरत होते. मी मतदान अधिकारी क्रमांक तीन असल्याने बॅलेट सोडणे ही मुख्य जबाबदारी माझ्यावर होती.तरी देखील ही ड्युटी म्हणजे एक टीमवर्क असतं त्यामुळे शाई लावण्याची जबाबदारी ही घ्यावी लागते. आणि जास्त प्रमाणात शाई लागली तर बोटाची कातडी जाते. म्हणून मी एक हॅन्ड ग्लोज बॅग मध्ये टाकला. तो टाकत असताना माझ्या मनात विचार आला. ट्रेनिंगमध्ये गप्पांमध्ये हा विषय झाल्याने काही महिला भगिनी तयारीने येथीलही. परंतु उरलेल्याचं काय?किंवा पुरुष कर्मचारी यांचं काय? परत विचार आला फर्स्ट एड किट तर असणारच आहे. म्हणून मी सहज OPO 255 PHaltan Vidhansabha, हा निवडणूक प्रक्रिया सुलभ होण्यासाठी साहेबांनी केलेल्या ग्रुप वर मेसेज टाकला. 'त्या साहित्या सोबत शाई लावण्यासाठी हँड ग्लोज मिळावा ही विनंती'. माझ्या नंतर कराडच्या एका शिक्षकांनी विचारले 'साहित्य जमा करून परत येण्यासाठी बस आहे का?'साहेबांनी लगेच त्यांना 'हो' असा रिप्लाय दिला.त्यामुळे आधी मला थोडं गिल्टी फील झालं. अगदी क्षुल्लक.. गोष्टीसाठी आपण मागणी केली. हे चुकलं तर नाही ना? पण एका मनानं असं समजावलं,... निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याची अतिशय जबाबदारीची आणि धोक्याची ड्युटी पार पाडण्यासाठी नेमलेल्या व्यक्ती त्या दोन दिवसाची ड्युटी अत्यंत काळजीपूर्वक.. प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करत असतात. काहीजण तर अक्षरश: धास्ती घेतात.. या ड्युटीची. निवडणुकीसाठी होत असलेला वारेमाप खर्च पाहता हॅन्ड ग्लोज चा खर्च म्हणजे अगदी क्षुल्लक आणि सर्वांच्या गरजेचा आणि उपयोगाचा आहे.चला जाऊ द्या... अशी मनाची समजूत काढून बॅग आटोपली.

          आज सकाळी नेहमीप्रमाणे गोडाऊन हॉलच्या तिथे तो भव्य मंडप,मंडपा बाहेर रुचकर नाश्त्याची सोय,पाण्याचे भरलेले जार, मंडपाच्या प्रवेशद्वारात अटेंडन्स, चांगल्या क्वालिटीचे आय कार्ड, पुढे मंडपात व्यासपीठा शेजारी सर्व आरक्षित कर्मचारी, व्यासपीठावर उभे राहून (पाच पाच तासाची आठ प्रशिक्षणे पार पाडून) आज पुन्हा शेवटच्या प्रशिक्षणासाठी उभे असलेले साहेब, तोच आवाज, तीच भाषाशैली, कधी धमकीचा दंडुका तर कधी विनोदाची झालर.पण सरते शेवटी सारं हेच की, काम व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे करा. टेन्शन ने शुगर लेवल कमी झाली तर लेमनच्या गोळ्या सुद्धा किटमध्ये पुरवल्यात. त्या खा पण टेन्शन घेऊ नका. आणि जागा सोडू नका. असं सांगणारे साहेब... प्रत्येक टीम बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, ना गडबड, ना गोंधळ.. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सोयीचं बूथ मिळाल्याचे समाधान. सगळं कसं सुरळीत, शांततेत, शिस्तीत आणी हसत खेळत....

लाल परीने प्रवासाचा आनंद माझ्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.पाच किलोमीटर अंतरावरचे प्राधान्यक्रम दिलेले पहिलेच बूथ मिळाले. बुथवर गेल्यावर बूथ मॅनेजमेंट साठी एक एक साहित्य सर्वजण पाहत होतो. ते सी यू,बी यु,व्हीव्हीपॅट, ते सर्व वेगवेगळे बोर्ड्स ,सील्स, ऍड्रेस टॅग, स्पेशल टॅग अगदी नव्याने ओळख करून घेत होतो.आणि.. आणि.. आणि...आणि अचानक मला हॅन्ड ग्लोज दिसला. वाव किती आनंद झाला! आनंद त्या हॅन्ड ग्लोज चा नाही... त्या कर्तव्यदक्ष भावनेचा,...त्या कर्तव्यपरायण कृतीचा,..त्या workholics प्रवृत्तीचा...... सलाम त्या कर्मयोग्याला ????????

आणि विं दा करंदीकरांच्या त्या ओळी तोंडातून बाहेर पडल्या, 

उसळलेल्या दर्याकडून 

पिसाळलेली आयाळ घ्यावी..

भरलेल्या भीमेकडून 

तुकोबाची माळ घ्यावी..


वेड्यापिशा ढगाकडून 

वेडेपिसे आकार घ्यावे 

रक्तामधल्या प्रश्नासाठी 

पृथ्वीकडून होकार घ्यावे.. 


देणाऱ्याने देत जावे

घेणाऱ्याने घेत जावे 

घेता घेता एक दिवस 

देणाऱ्यांची हात घ्यावे.......


श्रीमती अहिल्या कृष्णात भोजने, 

उपशिक्षिका, जि. प. प्राथमिक शाळा भिवरकरवाडी ता.फलटण जि.सातारा

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER