Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अमृत महोत्सवी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहोळा

दि. ९ मे रोजी ना. अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते होणार सत्कार, अध्यक्षस्थानी आ. जयंत पाटील
टीम : धैर्य टाईम्स
फलटण दि. ७ : 

 

ऐतिहासिक फलटण संस्थानचे अधिपती, महाराष्ट्र विधान परिषद माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मंगळवार दि. ९ मे रोजी सायंकाळी ५.०० वाजता मुधोजी क्लब मैदान, फलटण येथे विधानसभा विरोधी पक्षनेते ना. अजित पवार यांच्या हस्ते सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील अध्यक्षस्थानी असून राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री ना. शंभूराज देसाई विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यावेळी खा. श्रीनिवास पाटील, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. विक्रमसिंह पाटणकर, आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ.बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

दरम्यान, आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी ७५ व्या वाढदिवसानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, त्यापैकी शेतकरी संवाद मेळावा, मॅरेथॉन, सायकल रॅली, भव्य बैलगाडी शर्यत, छ. संभाजी महाराज चषक क्रिकेट सामने, चित्रकला स्पर्धा वगैरे काही कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहेत.

 सोमवार दि. ८ मे रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या दरम्यान सासवड, ता. फलटण येथे गोविंद पैठणी स्पर्धा हा महिलांसाठी कार्यक्रम होईल.

सोमवार दि. ८ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता मुधोजी क्लब मैदान, फलटण येथे खास महिलांसाठी कार्यक्रम ‘आरजे’ अक्षय प्रस्तुत ‘खेळ रंगला पैठणीचा’ विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. 

 दि. १ मे ते ३० जून २०२३ दरम्यान गोविंद कामधेनू उत्कृष्ट संकरीत कालवड निवड स्पर्धा ऑनलाईन होतील.

मंगळवार दि. ९ मे रोजी सकाळी ९.०० वाजता फलटण तालुक्यातील प्रमुख ७५ मंदिरांमध्ये कृष्णेच्या पाण्याने जलाभिषेक व पूजा कार्यक्रम होईल. त्यासाठी सोमवार दि. ८ मे रोजी दुपारी ३ वाजता श्रीराम मंदिर, फलटण येथे या ७५ गावातील ग्रामस्थ बंधू - भगिनी यांचेकडे कृष्णेचे पाणी सुपूर्द करण्यात येणार आहे.

मंगळवार दि. ९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता मुधोजी क्लब मैदान, फलटण येथे आयोजित मुख्य सत्कार सोहळ्यात आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना चांदीच्या अमृत कुंभामध्ये कृष्णेचे पवित्र जल देवून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.

सदर अमृत कुंभ मंगळवार दि. ९ मे रोजी दुपारी ३ वाजता शंकर मार्केट येथून पालखीत ठेवून मिरवणुकीने सभास्थानी नेण्यात येणार आहे.

त्यानंतर दुपारी ४.०० वाजता मुधोजी क्लब मैदानावर कृष्णेच्या पाण्याने आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ग्रंथ व जल तुलेचे आयोजन करण्यात येत आहे.   

त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेते ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते कृष्णेच्या पाण्यासह चांदीचा अमृतकुंभ, शाल, श्रीफळ, पुष्पहार घालुन आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

त्यापूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषद आणि जायंटस ग्रुप, फलटण यांच्यावतीने ग्रंथतुला व धान्य तुला होणार आहे. आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळ्यास संपूर्ण सातारा जिल्ह्यासह शेजारच्या पुणे, सोलापूर जिल्ह्यातील आणि फलटण तालुक्यातील बहुसंख्य जनतेने उपस्थित रहावे, असे आवाहन आ. दिपकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा समितीतर्फे करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER