फलटण प्रतिनिधी :
येथील प्रभाग क्रमांक दोन मधील मंगळवार पेठ येथे असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन व बुद्ध विहार (शेरी) तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व अभ्यासिका येथील विविध सुशोभीकरण तात्काळ करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२६ च्या वतीने नुकतेच नगरपालिकेला देण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व अभ्यासिका तसेच शेरी येथील बुद्ध विहार या सभागृहांचे बांधकामातील डागडुजी, रंगकाम, दरवाज्यांची दुरुस्ती, स्लाइडिंग, लाईट फिटिंग, पंखे बसवणे, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी प्युरिफायर बसवणे, खुर्ची - टेबल व्यवस्था, स्मृती भवन व शेरी येथील बुद्ध विहारास रंगीत लाईट फिटिंग करणे अशी विविध कामे करावीत असे निवेदनात म्हटले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवापूर्वी निवेदनातील कामे पूर्ण होतील असे आश्वासन लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी आश्वासन दिले.
यावेळी नगरसेवक सुदाम आप्पा मांढरे, सचिन अहिवळे, पंकज पवार, किरण राऊत, राहुल भैया निंबाळकर, यांच्यासह रणजीत भोसले, अमोल सस्ते, संजय गायकवाड, हरिष आप्पा काकडे आदि मान्यवर उपास्थित होते.











