Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा

कृष्णा हॉस्पिटलने दुसऱ्या लाटेतही पूर्ण केले कोरोनामुक्तीचे सहस्त्रक

११०० हून अधिक रूग्णांना डिस्चार्ज; आजअखेर ४३७८ रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश
टीम : धैर्य टाईम्स
गेल्या काही दिवसांत दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र असून, ही सकारात्मक बाब आहे. मात्र तज्ज्ञांनी पुन्हा तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असून, या लाटेचा सामना करण्यासाठीही कृष्णा हॉस्पिटल सज्ज आहे. कोरोना साथीचे गांभीर्य ओळखून रूग्णांनी स्वत:च घरात उपचार घेत न बसता, दवाखान्याशी संपर्क साधून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच रूग्णालयात अथवा घरात उपचार घ्यावेत, डॉ. सुरेश भोसले, अध्यक्ष कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट

पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी आधारवड ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही ११०० हून अधिक रूग्णांना कोरोनामुक्त करत, कोरोनामुक्तीचे सहस्त्रक पूर्ण केले आहे. आजअखेर एकूण ४३७८ रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात कृष्णा हॉस्पिटलला यश प्राप्त झाले असून, कोरोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या अथक वैद्यकीय सेवेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलने प्रारंभीपासूनच कोरोनामुक्तीच्या लढ्यात महत्वाचे योगदान दिले आहे. हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये सुरू असलेल्या उपचारांमुळे १८ एप्रिल २०२० रोजी पहिल्या कोरोनामुक्त रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीची मालिकाच सुरू झाली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या यशस्वी निगरानीखाली दिवसेंदिवस कोरोनामुक्तीचा आकडा वाढत, आजअखेर कृष्णा हॉस्पिटलने ४३७८ रुग्णांना कोरोनामुक्त केले आहे. याबाबत सविस्तर माहिती देताना कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले, की गेल्यावर्षी आपण कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना केला आणि यावर्षी दुसऱ्या लाटेचा सामना करतोय. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही गंभीर स्वरूपाची आहे. या दुसऱ्या लाटेत जलद गतीने संक्रमण होताना आढळले; किंबहुना तरूणांमध्ये याचे संक्रमण अधिक आढळून आले. त्यातही या लाटेत सुरवातीच्या काळात रूग्णात फारशी लक्षणे दिसून येत नसल्याने, अनेकांनी गंभीर स्थिती झाल्यावरच दवाखान्यात दाखल होण्याचा मार्ग पत्करलेला दिसतो. कृष्णा हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या लाटेत आजअखेर सुमारे १५०० कोरोनाग्रस्त रूग्ण दाखल झाले. त्यापैकी ११०० कोरोनामुक्त रुग्णांना डिस्जार्च देण्यात आला असून, उर्वरित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या या दुसरा लाटेचा सामना करण्यासाठी कृष्णा हॉस्पिटलने ४०० बेडचा स्वतंत्र कोरोना वॉर्ड करून, याठिकाणी ऑक्सिजन व व्हेंटीलेटर बेडची संख्याही वाढविण्यात आली आहे. इतरांप्रमाणे ऑक्सिजन, औषधे व इंजेक्शनचा तुडवडा भासला असला, तरी या आव्हानांना तोंड देत अधिकाधिक रूग्णांवर यशस्वी उपचार करण्यात कृष्णा हॉस्पिटलला यश आले आहे. दरम्यान, यावर्षी म्युकरमायकोसिस या नव्या आजारानेही डोके वर काढले असून, या आजाराचा प्रादुर्भाव झालेले ५ रूग्ण कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचाराचा दाखल झाले आहेत. या आजाराच्या उपचारासाठी फिजिशियन, नेत्ररोगतज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ यांची संयुक्त टीम तयार करण्यात आली असून, दाखल रूग्णांपैकी ३ बरे झाले असून एकावर उपचार सुरू आहेत. मात्र या आजारावरील औषधांचा तुटवडा सध्या जाणवतोय.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER