फलटण नगरपरिषदेचे अधिकारी तथा युवा नेते मुकेश अहिवळे यांचे विविध स्तरातून वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र राज्य नगर परिषद व नगर पंचायत कर्मचारी संघटनेचे सातारा जिल्हा कोषाध्यक्ष, फलटण नगर परिषदेचे उच्चशिक्षित कर्मचारी व फलटण नगर परिषद क्रिकेट संघाचे कर्णधार मुकेश अहिवळे यांचा आज वाढदिवस विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मुकेश अहिवळे हे गेले काही वर्षापासून फलटण नगर परिषद येथे कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. फलटण नगर परिषदेच्या विविध विभागांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कार्य केलेले आहे. नगर परिषदेमध्ये जनतेला योग्य मार्गदर्शन व सातत्यपूर्ण कामातील व्यस्त कर्मचारी म्हणून त्यांची गणना केली जाते.
मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली यांच्यातर्फे त्यांना म्हणून सन्मानित कोविड योद्धा गौरवण्यात आले आहे.
मुकेश अहिवळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने धैर्य टाईम्सचे संपादक सचिन मोरे यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी मयूर जगदाळे,कुणाल मोरे,करण काशीद, मयूर कुंभार,विशाल काकडे,विक्रम काकडे आदी उपस्थित होते.



















