फलटण प्रतिनिधी :
- राजे गटाचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग 13 मध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रचारात आघाडीवर असून प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधत जनसंपर्क मोहीम जोमात सुरू आहे. घराघरांत जाऊन नागरिकांच्या अडचणींची माहिती घेण्यावर विशेष भर दिला जात आहे.
प्रभाग 13 ‘ब’ मधून उमेदवार सौ. रुपाली अमोल सस्ते यांनी शनिवारी व रविवारच्या दौऱ्यात मोठ्या प्रमाणात मतदारांशी संवाद साधत स्थानिक प्रश्न जाणून घेतले. या वेळी नागरिकांनी अनेक गंभीर समस्या व्यक्त केल्या.
नागरिकांनी मांडलेल्या प्रमुख समस्या
“रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था असून अनेक ठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले आहेत. अपघातांचा धोका वाढला आहे.”
“ड्रेनेज लाईन वारंवार तुंबते. घाण पाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी व आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.”
“स्ट्रीट लाईटचा अभाव असून रात्रीच्या वेळी असुरक्षितता जाणवते. विद्यार्थ्यांना व कामगारांना त्रास सहन करावा लागतो.”
नागरिकांनी मांडलेले विकासात्मक मुद्दे
प्रभागात प्राथमिक आरोग्य केंद्राची अत्यंत आवश्यकता
सार्वजनिक उद्यान आणि जॉगिंग ट्रॅकची मागणी
सीसीटीव्ही कॅमेरे व पोलिस बीट व्यवस्था – सुरक्षेसाठी अत्यावश्यक
पार्किंगची व्यवस्था नसल्याने नागरिकांचे हाल
स्वच्छता व कचरा संकलनासाठी अधिक गाड्या व कामगारांची आवश्यकता
यावेळी बोलताना सौ. रुपाली अमोल सस्ते म्हणाल्या,“प्रभागातील प्रत्येक प्रश्न आम्ही प्राधान्याने सोडवणार आहोत. पाणी, रस्ते, प्रकाशव्यवस्था व स्वच्छता यांसारख्या मूलभूत सेवांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणू. नागरिकांचा विश्वास हा आमची ताकद आहे आणि निवडून आल्यानंतर कामांच्या माध्यमातून दाखवून देऊ.”
प्रचार मोहिमेस स्थानिक महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांचा जोरदार उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रभाग 13 मध्ये भाजपा – राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचंड जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.


















