Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी

पालिका संकलित कराच्या थकबाकीवरील दंडव्याज माफ करावे

पृथ्वीराज चव्हाण : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
टीम : धैर्य टाईम्स
The corporation should waive the penalty interest on the tax arrears
संपूर्ण भारतात कोरोना महामारीमूळे मार्च २०२० ते आजपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे बहुतांश: उद्योगधंदे, व्यापार, रोजगार बंद झाल्यामुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. उत्पन्नाचे आर्थिक स्त्रोत बंद झाले आहेत.

कराड :  संपूर्ण भारतात कोरोना महामारीमूळे मार्च २०२० ते आजपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे बहुतांश: उद्योगधंदे, व्यापार, रोजगार बंद झाल्यामुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. उत्पन्नाचे आर्थिक स्त्रोत बंद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील नगरपालिकांद्वारे नागरिक, व्यापाऱ्यांकडून वसूल करण्यात येणारी एकत्रित संकलित कराची वसुली होण्यासाठी व नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सन २०१९-२० व २०२०-२१ या वर्षाच्या थकबाकीवर दंड व्याजाची सर्व रक्कम माफ करण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रात म्हटले आहे की, राज्यातील नगरपालिका कार्यक्षेत्रामधील नागरिकांना एकत्रित संकलित कराची थकबाकी दंड व्याजासह भरणे जवळ-जवळ अशक्य झाले आहे. संबंधित नागरिकांकडून अधिनियमातील तरतुदीनुसार सक्तीने एकत्रित संकलित कर वसुल करण्यास अडचण येत आहे. एकत्रित संकलित कराची सक्तीने वसुली केल्यास नागरिकांच्या मनात शासनाच्या व नगरपरिषदेच्या विरुद्ध रोष निर्माण होत आहे. व्याजाची रक्कम माफ करण्याबाबत लेखी व मौखिक विनंती अर्ज नगरपालिकांकडे प्राप्त झाले आहेत.
नागरिकांनी मालमत्ता कराची रक्कम वसूल न झाल्यास त्याचा परिणाम नगरपालिकेच्या वसुलीवर, आर्थिक उत्पन्नावर, विकासकामांवर व विविध योजनांच्या (सांडपाणी प्रक्रिया योजना, प्रशासकीय इमारत, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प इ.) अंमलबजावणीवर होणार आहे. नगरपालिकेच्या उत्पन्नावर व पर्यायाने विकासकामांवर परिणाम होऊ नये. यासाठी एकत्रित संकलित करावरील शास्ती/ व्याजाची रक्कम १०० टक्के माफ केल्यास नगरपालिकेला एकरकमी मुद्दल वसुल होईल. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील प्रकरण ८ कराधान नियम मधील नियम ५१ मध्ये, ५१. शास्ती फी किंवा वसुलीचा खर्च माफ करता येतो आयुक्तास, आपल्या स्वेच्छानिर्णयानुसार नियम ४१ खालील शास्ती, किंवा नियम ५० खालील फी किंवा वसुलीचा खर्च पुर्णतः किंवा अंशतः माफ करता येईल अशी तरतूद आहे. परंतु, त्याप्रकारची तरतुद महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये नसल्याने नगरपालिकेस किंवा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना नगरपालिका क्षेत्रातील एकत्रित संकलित करावरील व्याज पुर्णतः अथवा अंशतः माफ करता येत नाही.
पत्रात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १६७ (अ) मध्ये, नगरपरिषदेस, जी व्यक्ती किंवा जे व्यक्तींचे वर्ग, नगरपरिषदेन निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार, मालमत्ता कराच्या थकबाकीची रक्कम प्रदान करील, अशा मालमत्ता कर प्रदान करण्यास प्रथमतः पात्र असलेल्या कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींच्या वर्गाला राज्य शासन मान्य करील अशी सुट देता येईल, अशी तरतुद आहे.
तसेच कोवीड-१९ महामारीमूळे विशेषबाब म्हणून राज्य शासनाने नगरपालिकांच्या एकत्रित संकलित करावरील शास्ती/व्याज १०० टक्के माफ केल्यास त्यांना संपुर्ण मुद्दलाची रक्कम एकरकमी प्राप्त होईल. त्यामूळे शासनावर कोणत्याही प्रकारचा आर्थिक ताण पडणार नाही. तरी या विषयाबाबत शासन स्तरावरुन निर्णय घेण्यास विनंती आहे, असे पत्रात माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER